Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र १०० कोटींच्या वसूलीबाबत एसीपी पाटील यांचे कानावर हात; केला नवा खुलासा

१०० कोटींच्या वसूलीबाबत एसीपी पाटील यांचे कानावर हात; केला नवा खुलासा

Related Story

- Advertisement -

सचिन वाझे प्रकरण आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहविभागाला अहवाल सादर केला आहे. यात परमबीर सिंह यांनीच सचिन वाझेंना पोलीस दलात आणण्यापासून महत्त्वाची कामे दिली हे स्पष्ट होत आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचा जबाब समोर आला आहे. सहाय्यक पोलीस आयु्क्त संजय पाटील आणि गु्न्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजू भूजबळ यांचा जबाब नोंदवला आहे. संजय पाटील यांनी १०० कोटींबाबतची नोंद जबाबात केली नाही आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या जबाबाने परमबीर सिंग यांच्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रामध्ये संजय पाटील यांच्या चॅटचा उल्लेख केला होता. ‘सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्या भेटीनंतर पाटील यांना १ हजार ७५० बार अँड रेस्टॉरंट आहेत, त्या प्रत्येकाकडून ३ लाख गोळा करण्यास सांगितल्याचं सांगितलं, असं परमबीर यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.’ मात्र, संजय पाटील यांनी जो जबाब नोंदवला आहे, त्यात आणि परमबीर सिंग यांच्या पत्रात तफावत आहे. संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबाबत असं म्हटलं आहे की, “तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १७५० बार आणि रेस्टॉरंट आस्थापना मुंबईमध्ये असून तीन लाखाप्रमाणे जमा होतात अशी त्यांना माहिती मिळाली होती त्याची त्यांनी वाझेंकडे विचारणा केली होती. हे सचिन वाझे यांनी मला सांगितलं असं पाटील यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे.” या जबाबावरुन परमबीर यांनी जे पत्रात म्हटलं आहे की, १०० कोटी गोळा करण्याचे आदेश दिले होते, तो दावा या जबाबात दिसत नाही आहे.

- Advertisement -

राजू भुजबळ आणि संजय पाटील ४ मार्च २०२१ रोजी अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वर बंगल्यावर त्यांना भेटले असल्याचा उल्लेख परमबीर सिंह यांनी केला आहे. मात्र या तिघांची एकत्र बैठक झाली नसल्याचं या दोन्ही अधिकार्‍यांनी जबाब दिला आहे. ४ मार्च रोजी आपण अधिवेशनाच्या ब्रिफींगसाठी गृहमंत्र्यांना ज्ञानेश्वरीवर भेटलो, तेव्हा संजय पाटील तिथे नव्हते, मी बाहेर पडताना दारात मला संजय पाटील भेटल्याचा भुजबळ यांनी सांगितलं. या जबाबमुळे माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रावरील दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

त्यामुळे परमबीर सिंग यांच्या पत्रामध्ये ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे, त्या दोन अधिकाऱ्यांचा जबाब आणि परमबीर सिंग यांचा पत्रातील दाव्यामध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

- Advertisement -