घरमहाराष्ट्र१०० कोटी वसूली प्रकरणात इतर पाच अनोळखी आरोपी कोण?

१०० कोटी वसूली प्रकरणात इतर पाच अनोळखी आरोपी कोण?

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला. यामध्ये अनिल देशमुख यांच्यासोबत ५ अनोळखी व्यक्तींना आरोपी म्हणून दाखवण्यात आलं आहे. हे पाच आरोपी कोण? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

१०० कोटीच्या वसुली प्रकरणी सीबीआयने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये अनिल देशमुख यांचं नाव असून इतर ५ जण अनोळखी आरोपी दाखवण्यात आले आहेत. हे पाच आरोपी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सीबीआयने एफआयआर दाखल करण्यापूर्वी तत्कलिन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि पालांडे आणि स्वत: अनिल देशमुख यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आला होता.

- Advertisement -

अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची साडेसहा तास झाडाझडती

अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळी सीबीआयनं छापा टाकला. जवळपास साडे सहा तास अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली आहे. १२ अधिकाऱ्यांची टीम आज सकाळी साडेसातच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर 9 ठिकाणी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -