घरमहाराष्ट्रअनिल देशमुख यांची आज CBI चौकशी; आजचा दिवस निर्णायक ठरणार?

अनिल देशमुख यांची आज CBI चौकशी; आजचा दिवस निर्णायक ठरणार?

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांसंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) चौकशी करणार आहे. दोन दिवसांपूर्वी CBI ने अनिल देशमुख यांना समन्स बजावला होता. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांची सीबीआयने कसून चौकशी केली होती. देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची जवळपास आठ तास झाडाझडती घेण्यात आली होती.

अनिल देशमुख आज CBI च्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. त्यामुळे आज नेमकं काय घडतं हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. CBI अनिल देशमुख यांची आजच चौकशी करते की पुन्हा एकदा चौकशीला बोलावणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यामुळे आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी सकाळी ११ वाजता अंधेरीतील डीआरडीओच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक ठरणार आहे.

- Advertisement -

तथापि, या प्रकरणात परमबीर सिंग आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची देखील CBI ने चौकशी केली होती. परमबीर सिंग आणि संजय पाटील यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरुन सीबीआयचे अधिकारी आज अनिल देशमुख यांना प्रश्न विचारतील. या सगळ्यावर अनिल देशमुख काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -