घरताज्या घडामोडीParambir Singh : परमबीर सिंह बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय

Parambir Singh : परमबीर सिंह बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय

Subscribe

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पळ काढल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासाठी लुकआऊट नोटीस काढण्याच्या आधीच त्यांनी भारत सोडल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर हे जुलैमध्ये जारी करण्यात आले होते. परमबीर सिंह सुट्टीवर गेल्यावर दोन महिन्यांनी LOC नोटीस जारी करण्यात आले होते.

एएनआय या वृत्तसंस्थेला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीला LOC नोटीस जारी केल्यानंतर त्या व्यक्तीला एअरपोर्ट इमिग्रेशनच्या प्रक्रियेत अडवले जाते. त्यामुळे इमिग्रेशन प्रक्रिया पुर्ण करून देश सोडण्याची शक्यता जवळपास शून्यच असल्याचे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जेव्हा एखाद्या व्यक्तीविरोधात LOC जारी करण्यात येते, त्यावेळी अशा व्यक्तीचा पासपोर्ट हा संबंधित यंत्रणेकडून ताब्यात घेण्यात येतो. परमबीर सिंह यांच्याविरोधात एफआयर दाखल केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने LOC नोटीस जारी केली, असे त्या अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले. याआधीच तपास यंत्रणांनीही परमबीर सिंह यांनी भारतातून पळ काढल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे.

- Advertisement -

बनावट आयडी आणि फोटो वापरला 

बनावट पासपोर्टच्या आधारेच परमबीर सिंह यांनी भारताबाहेर पळ काढल्याची दाट शक्यता त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट आयडी आणि स्वतःचा फोटो वापरून हा बनावट पासपोर्ट तयार केलेला असू शकतो, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली. अनेकदा बनावट पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना अटक होतेच, पण ही संपुर्ण संगणकीय प्रक्रिया असल्याने मानवी हस्तक्षेपाअभावी अनेकदा व्यक्ती बनावट पासपोर्टद्वारे निसटतात असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले की, तपास यंत्रणांनाही परमबीर सिंह कुठे आहेत, याबाबतची माहिती नाही. परमबीर सिंह हे रशियाला गेल्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. पण सरकारी अधिकारी म्हणून सरकारच्या परवानगीशिवाय ते असा अधिकृतपणे प्रवास करू शकत नसल्याचेही तो अधिकारी म्हणाला.

- Advertisement -

परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून ही वसुली करण्याचे आदेश देशमुख यांनी दिल्याचेही त्यांनी म्हटले होते. एपीआय सचिन वाझेच्या माध्यमातून अनिल देशमुख ही सगळी वसुली करत असल्याचेही आरोप परमबीर सिंह यांनी केले होते.

परमबीर सिंह यांना डिमोटेड करत त्यांना होमगार्ड विभागाचे महासंचालक ही नवीन जबाबदारी देण्यात आली होती. २२ मार्चला त्यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरून काढण्यात आले. अॅंटेलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा फटका त्यांना बसला. केंद्रीय तपास यंत्रणेसमोर ते ७ एप्रिलला आपला जबाब नोंदविण्यासाठी हजर झाले होते. पण एनआयएने वारंवार समन्स बजावूनही ते पुढील तपासासाठी हजर झाले नाहीत.

वारंवार सुट्टीसाठी केला अर्ज 

होमगार्डचा पदभार सांभाळल्यानंतर परमबीर सिंह हे प्रकृतीच्या कारणास्तव सु्ट्टीवर गेले. त्यानंतर सिंह यांनी वारंवार सुट्टी वाढवून मिळावी म्हणून अर्ज केले. ७ मे पासून सुट्टीवर सलग तीन महिने त्यांनी सुट्टी घेतली. त्यानंतर ३१ ऑगस्टला त्यांची सुट्टी संपली. सुट्टी संपल्यानंतर गृह विभागाने एक सीआयडी पथक त्यांच्या राहत्या घरी मलबार हिल आणि चंदीगढ येथेही पाठवले. पण ते दोन्ही ठिकाणी नसल्याचे सीआयडीच्या टीमच्या पाहणीत आढळले. त्यानंतर तपास यंत्रणांनी वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह हे चौकशीला हजर राहिले नाहीत. तसेच १ सप्टेंबरपासून सुट्टीवर गेल्यानंतर त्यांनी कोणालाही माहिती दिली नाही. संबंधित खात्याला म्हणजे गृह विभागाला तसेच मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी कळवले नाही. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये IAS, IPS अधिकाऱ्यांना सुट्टीसाठी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची गरज असते.

चांदीवाल कमिशनचा समन्स

मनी लॉड्रिंग प्रकरणात महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल कमिशनने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हा शेवटचा समन्स असल्याचे बोलले जात आहे. परबीर सिंह हे जूनपासून तपास यंत्रणांसमोर चौकशीला हजर झालेले नाहीत. त्यामुळे सिंह यांनी देश सोडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणी आधीच लूक आऊट सर्क्यूलर बजावले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -