घरमहाराष्ट्रशीना बोर हत्याप्रकरणात परमबीर सिंहांचे कनेक्शन आले समोर, राहुल मुखर्जीच्या जबाबातून माहिती...

शीना बोर हत्याप्रकरणात परमबीर सिंहांचे कनेक्शन आले समोर, राहुल मुखर्जीच्या जबाबातून माहिती उघड

Subscribe

शीना बोरा हत्येप्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शीना बोरा बेपत्ता झाल्याची माहिती 2021 साली सर्वात अगोदर आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांना देण्यात आली होती. शीना बोराचा मित्र राहुल मुखर्जीने कोर्टात जबाब नोंदवताना ही माहिती दिली.

परमबीर सिंह यांनी मला शीना बेपत्ता असल्याची तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलीस स्थानकात गेलो मात्र, पोलिसांनी माझी तक्रार नोदंवून घेतली नाही. परमबीर सिंह माझ्या आईचे चांगले मित्र आहेत. मात्र, तक्रार नोंदवण्यास परमबीर सिंह यांनी खास मदत केली नाही, असे राहुल मुखर्जीने आपल्या जबाबात सांगीतले.

- Advertisement -

रायगडच्या जंगला सापडला होता मृतदेह –

2 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातल्या जंगलात शीना बोराचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी परमबीर सिंह हे कोकण विभागाचे महासंचालक होते. शीना बोराचा मृतदेह हा रायगड जिल्ह्यात सापडला होता.

- Advertisement -

काय आहे प्रकरण –

24 एप्रिल 2012 ला शीना बोराची हत्या झाली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आले होते. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक केले होते. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. त्यांच्याच मदतीने 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठले होते. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता. इंद्राणी मुखर्जीला साडेसहा वर्षानंतर मे महिन्यात जामीन मंजूर झाला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -