घरमहाराष्ट्रदक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांची आत्महत्या, सुसाईड नोटही सापडली

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांची आत्महत्या, सुसाईड नोटही सापडली

Subscribe

मुंबई – दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पारवाल यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ते ज्या इमारतीत राहत होते, त्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी घेत त्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं.

भायखळा येथील शांती कमल या इमारतीत पारवाल कुटुंब राहतं. या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून आज सकाळी सहा वाजल्याच्या सुमारास उडी घेतली. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून त्यांनी जीवन संपवले आहे. इमारतीच्या टेरेसवरून त्यांनी खाली उडी मारली. त्यानंतर, पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या जिमच्या खोलीत त्यांना एक सुसाईड नोट सापडली आहे. आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. कोणाचीही चौकशी करू नये. तसंच, व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून जीवन संपवले आहे, असं या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे.

- Advertisement -

पारस पोरवला यांच्या आत्महत्येने पोरवाल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. बांधकाम व्यावसायिक वर्तुळातही मोठी खळबळ माजली आहे. पारस पोरवाल यांनी दक्षिण मुंबईत अनेक इमारती बांधल्या आहेत. पारस पोरवाल मृत्यूप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -