Homeमहाराष्ट्रमराठवाडाParbhani Ambedkar Statue : 24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा... प्रकाश आंबेडकरांचा...

Parbhani Ambedkar Statue : 24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा… प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेतील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेतील हल्लेखोरांना 24 तासांच्या आतमध्ये अटक करा अन्यथा त्याचे परिणाम चांगले होणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेतील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेतील हल्लेखोरांना 24 तासांच्या आतमध्ये अटक करा अन्यथा त्याचे परिणाम चांगले होणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. (Prakash Ambedkar gave warning said arrest people in parbhani within 24 hours who insulted constitution.)

हेही वाचा : Satish Wagh Murder : शेजाऱ्यानेच दिली आमदाराच्या मामाची सुपारी, हत्येप्रकरणी पुणे पोलिसांकडून धक्कादायक खुलासा

परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या पुस्तकाची विटंबना करण्याप्रकरणी आज परभणीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच सध्या या बंदला हिंसक वळण लागले असून आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली आहे. तसेच काही जणांनी पोलिसांच्या गाड्यांवर देखील दगडफेक केल्याची घटना यावेळी घडली आहे. परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आले असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे पाहायला मिळाले आहे. या आंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या गाड्यांवर देखील ही दगडफेक करण्यात आली असून हातात काठ्या घेऊन हे आंदोलक शहरामध्ये फिरताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा पथकांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे.

हेही वाचा : Raigad Politics : शेकाप सोडलेले आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर ? शेकापमधील नाराजी कशामुळे ?

परभणीतील या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आता इशारा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. येत्या 24 तासांमध्ये सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकरांनी समाजातील लोकांना केले आहे. (Prakash Ambedkar gave warning said arrest people in parbhani within 24 hours who insulted constitution.)


Edited By Komal Pawar Govalkar