घरताज्या घडामोडीParbhani : हा मंत्री फाटकाच आला, मंत्रीपद गेल्यावरही फाटकाच राहिला; जानकरांबद्दल फडणवीसांचे...

Parbhani : हा मंत्री फाटकाच आला, मंत्रीपद गेल्यावरही फाटकाच राहिला; जानकरांबद्दल फडणवीसांचे वक्तव्य

Subscribe

हा मंत्री फाटकाच आला, मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला, आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटका राहणार आहे. म्हणूनच लोकांच्य मनामध्ये जानकरांचे घर आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्याबाबत वक्तव्य केले.

हा मंत्री फाटकाच आला, मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला, आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटका राहणार आहे. म्हणूनच लोकांच्य मनामध्ये जानकरांचे घर आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्याबाबत वक्तव्य केले. रासप नेते महादेव जानकर यांनी आज (1 एप्रिल) परभणी लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीतील प्रचारसभेत विरोधकांवर निशाणा साधला. (parbhani mahadev jankar candidate of mahayuti in lok sabha 2024 devendra fadnavis)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर आम्ही थेट परभणीला महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आलो. त्यावेळी परभणीला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितले की, 18 लोकसभेत मी जानकर यांचा वाट पाहत आहे. तुमची जबाबदारी आहे, त्यांना निवडून आणायची. मी महादेव जानकरांना तुमच्याकडे पाठवलं आता, तुम्ही त्यांना परभणीचे खासदार बनवून संसदेत पाठवा”, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

“महादेव जानकर मूर्ती लहान आणि किर्ती महान आहेत. पाच वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळात काम केलं. कोणतीची कुरकूर त्यांनी केली नाही. सातत्याने आपल्या खात्याचे काम नेटानी करायचं. सामान्य माणसाकरता काम करायचं. पाच वर्षांच 1 रुपयाचा डाग सुद्धा या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला, मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला, आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटका राहणार आहे. म्हणूनच लोकांच्य मनामध्ये जानकरांचे घर आहे. महादेव जानकरांची श्रीमंती म्हणजे इथे बसलेले लोक आहेत. महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील दलीत गोरगरिब, आदिवाशी, शेतकरी, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्याबद्दल जानकरांबद्दल जी जागा आहे, तीच महादेव जानकरांची श्रीमंती आहे. म्हणूनत आम्ही निर्णय घेतल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला मिळाली, तेव्हा आम्ही अजितदादांना सांगितले की, या जागेत आपण महाजेव जानकरांना लढवलं पाहिजे. तेव्हा अजितदादांनी तत्काळ विटेकरांना बोलवलं आणि त्यांना ही जागा महादेव जानकरांना द्यावी लागेल असे सांगितले. तेव्हा त्यांना विरोध न करता ही जागा महादेव जानकरांना दिली. त्यामुळे आता महायुतीतील तिन्ही पक्ष आणि मित्र पक्ष संपूर्ण गठबंधन हे महादेव जानकर यांच्या पाठिशी उभे राहणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“मागच्या लोकसभेत महाराष्ट्राने 41 खासदार पंतप्रधान मोदींच्या झोळीत टाकले. यंदा त्यापेक्षा जास्त खासदार मोदींसोबत जाणार आहेत. त्या खसदारांमध्ये जसे पंकजा मुंडे असतील, तसेच महादेव जानकर ही असणार आहेत”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात देश बदलला. गरिबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा. पण पहिल्यांदाच या देशात गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवला. 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरिब रेषेच्याबाहेर काढले. त्यामुळे जग तोंडात बोटं घालत आहेत. सातत्याने गरिबांचा विचार केला आणि प्रयत्न करत परिवर्तन केले”, असे फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : अयोध्या पौळ कल्याणहून ठाकरे गटाच्या उमेदवार, 1 एप्रिलला फेसबूक पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -