घरताज्या घडामोडीParbhani : ठाकरेंचे उमेदवार निवडून आल्यानंतर जनतेला, विकासाला विसरायचे; फडणवीसांची संजय जाधवांवर...

Parbhani : ठाकरेंचे उमेदवार निवडून आल्यानंतर जनतेला, विकासाला विसरायचे; फडणवीसांची संजय जाधवांवर टीका

Subscribe

जुन्या खासदारांकरता आम्हीच मत मागायचो, पण दुर्देवाने सांगावं वाटतं की ते निवडून आल्यानंतर तुम्हाला, दिल्लीला, लोकसभेला आणि विकासाला विसरत होते. त्यांचा फंडा पक्का होता तो म्हणजे निवडणूक आली की उभं राहायचं लोकांची मत मागायची आणि त्यानंतर विकासाल विसरून जायचं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव यांच्यावर निशाणा साधला.

परभणी : जुन्या खासदारांकरता आम्हीच मत मागायचो, पण दुर्देवाने सांगावं वाटतं की ते निवडून आल्यानंतर तुम्हाला, दिल्लीला, लोकसभेला आणि विकासाला विसरत होते. त्यांचा फंडा पक्का होता तो म्हणजे निवडणूक आली की उभं राहायचं लोकांची मत मागायची आणि त्यानंतर विकासाल विसरून जायचं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव यांच्यावर निशाणा साधला. (parbhani mahadev jankar devendra fadnavis slams mp sanjay jadhav)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात देश बदलला. गरिबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा. पण पहिल्यांदाच या देशात गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवला. 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरिब रेषेच्याबाहेर काढले. त्यामुळे जग तोंडात बोटं घालत आहेत. सातत्याने गरिबांचा विचार केला आणि प्रयत्न करत परिवर्तन केले. पण 10 वर्षात तुम्ही जे परिवर्तन पाहिले. तो फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे. पुढील पाच वर्षात भारत आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने बदल होणार आहे याचा विचार आपण करू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणतात”, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. पण एक खंत अजित पवारांनी बोलून दाखवली की समृद्धी महामार्ग आमच्या परभणीला टच झाला नाही. समृद्धी महामार्गाच्या मार्गात परभणी नाही. पण मी अजितदादांना सांगतो की, काळजी करू नका. आता समृद्धी प्रमाणाचे आम्ही शक्तीपीठ मार्ग बनवायला घेतला आहे. नागपूरपासून गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा शक्तीपीठ महामार्ग पभणीतून जाणार असून या महामार्गावर इंडस्ट्रीअल क्लस्टर तयार केले जाणार आहेत. MIDC तयार केली जाणार आहे. तसेच अनेक प्रकल्प तयार केले जाणार आहे. समृद्धी महामार्गामुळे 15 जिल्ह्यांना समृद्धी मिळाली. त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गावर पायाभूत सविधा तयार केल्या जाणार आहेत”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“परभणीतून जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमामात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. पण यासाठी एक खासदार मिळाला तर, मोठं परिवर्तन आम्ही करू शकतो. जुन्या खासदारांकरता आम्हीच मत मागायचो, पण दुर्देवाने सांगावं वाटतं की ते निवडून आल्यानंतर तुम्हाला, दिल्लीला, लोकसभेला आणि विकासाला विसरत होते. त्यांचा फंडा पक्का होता तो म्हणजे निवडणूक आली की उभं राहायचं लोकांची मत मागायची आणि त्यानंतर विकासाल विसरून जायचं. पण महादेव जानकर हे असे व्यक्ती आहे, कर्जाच्या माध्यमातून तुमच्याकडे मत मागत आहे आणि हे कर्ज जानकर पाच वर्षात विकासाच्या व्याजासहीत तुम्हाला परत करतील”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी परभणीचे विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

“जानकरांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत. महादेव जानकरांचे चिन्ह आता लवकरच येईल, नाहीतर कमळ, धनुष्यबाण किंवा घड्याळ शोधाल. पण कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे महादेव जानकरांच्या पाठीशी उभे आहे. जानकरांचे चिन्ह आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर हे चिन्ह घराघरांच पोहचवून महादेव जानकरांना निवडून आणायचे आहे. महादेव जानकर हा साधा माणूस आहे. हा फाटका माणूस आहे. त्यामुळे ही राजकीय निवडणूक नाही. जनतेची निवडणूक आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – Parbhani : हा मंत्री फाटकाच आला, मंत्रीपद गेल्यावरही फाटकाच राहिला; जानकरांबद्दल फडणवीसांचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -