घरताज्या घडामोडीBreaking: परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा ठाकरेंकडे राजीनामा; राष्ट्रवादीवर केले आरोप

Breaking: परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा ठाकरेंकडे राजीनामा; राष्ट्रवादीवर केले आरोप

Subscribe

परभणी जिल्ह्याचे खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपविल्याची माहिती मिळत आहे. परभणी जिल्ह्यात स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील दोन आघाडीच्या पक्षात पुन्हा एकदा विसंवाद असल्याचे समोर आले आहे.

परभणी जिल्ह्यातील स्थानिक वाद आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीने मर्जीतल्या कार्यकर्त्यांचे प्रशासकीय मंडळ नियुक्त केले होते. त्यामुळे शिवसैनिक नाराज होते. मात्र आता पुन्हा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचेच प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. जिंतूरमध्ये यावेळी राष्ट्रवादीचा आमदार देखील नाही. तरिही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना संधी मिळत असल्यामुळे संजय जाधव यांनी कंटाळून खासदारकीचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -