घरमहाराष्ट्रपरभणीत तरुणाची धनगर आरक्षणासाठी आत्महत्या

परभणीत तरुणाची धनगर आरक्षणासाठी आत्महत्या

Subscribe

आरक्षणाच्या मागणीवरुन परभणीमध्ये धनगर समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असताना परभणीमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाच्या तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. १९ वर्षाच्या योगेश राधाकिशन काकरे या तरुणाने आत्महत्या केली आहे.

१२ वीच्या विद्यार्थ्यांची आरक्षणासाठी आत्महत्या

अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय. दरम्यान परभणीच्या सेलू तालुक्यातील गोमेवाकडी गावामध्ये योगेश काकरे या १२ वीमध्ये शिकणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. योगेशने धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ पावने एकच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. योगेशच्या आत्महत्येनंतर आक्रमक झालेल्या धनगर समाजातील तरुणांनी त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यावर नेऊन ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांकडून १० लाखांची मदत जाहीर

या घटनेनंतर परभणीचे जिल्हाधिकाऱ्यांनी योगेशच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी योगेशच्या कुटुंबियांना १० लाखांची आर्थिक मदत तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोर केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

आत्महत्येपूर्वी फोनवरुन केला होता मॅसेज

आत्महत्येपूर्वी योगेशने त्याच्या मित्रांना आणि बी शिंदे यांना मॅसेज पाठवला होता. मात्र नेटवर्क नसल्यामुळे हा मॅसेज त्यांना पोहचू शकला नाही. यामध्ये त्यांने “धनगर आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे” असे या मॅसेजमध्ये लिहले असल्याचे परभणीच्या पोलीस उपअधिक्षक रेणुका वागळे यांनी सांगितले आहे. या प्रकणाचा आम्ही तसाप करत आहोत. पण धनगर आरक्षणाच्या मागणीसाठीच योगेशने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असल्याचे वागळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -