घरनवी मुंबईशालेय बसबाबत पालकांनो सावधान, मद्यधुंद अवस्थेत चालक चालवताहेत बस

शालेय बसबाबत पालकांनो सावधान, मद्यधुंद अवस्थेत चालक चालवताहेत बस

Subscribe

School Bus | शाळेपासून काही अंतरावर ही बस आली असता यामध्ये असणार्‍या चालकाने रिक्षाला धडक दिली. यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा बाजूला घेतल्याने अपघात होता होता वाचला. परंतु त्यावेळी स्थानिकांनी चालकाकडे धाव घेतली.

नवी मुंबई – जर पालकांनो आपल्या पाल्याला शालेय बसने (School Bus) शाळेत पाठवत असाल तर जरा सावधान रहा! नवी मुंबई लगत असणार्‍या उलवे परिसरात एका खाजगी शाळेचा बसचालक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असताना मद्य प्रशासन करून बेधुंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बस चालकाने एका रिक्षाला धडकही दिली.

उलवे येथील सेक्टर-१९ परिसरात असलेल्या इंंडियन मॉडेल स्कूल या शाळेचे एम.एच-४६ जे-०६७१ या शाळेची बस सकाळी शाळेतील मुलांना ने-आण करीत होती. शाळेपासून काही अंतरावर ही बस आली असता यामध्ये असणार्‍या चालकाने रिक्षाला धडक दिली. यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा बाजूला घेतल्याने अपघात होता होता वाचला. परंतु त्यावेळी स्थानिकांनी चालकाकडे धाव घेतली. या शाळेचे वाहन चालवणारा चालक चक्क सकाळीच मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचा प्रकार समोर आला. यावेळी गाडीत शालेय विद्यार्थी, महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – खोपोलीनजिक सहलीच्या बस दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; ४८ जण जखमी

गाडीच्या स्टेअरींगवर बसलेल्या वाहन चालकाला कोणत्याही प्रकारची शुध्द नव्हती. जर या चालकाने मद्य प्राशसन करून सुसाट गाडी चालवली असती तर एखादी अनुचित घटना घडली असती. या प्रकाराची माहिती पोलिस आणि शालेय व्यवस्थापनाला देण्यात आली. त्यानंतर या वाहन चालकावर कारवाई करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी चालकांसाठी नियमावली तयार करण्याची मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे. तसंच, आपल्याल पाल्याला शाळेत पाठवताना गाडीचा चालक शुद्धीत आहे की नाही हेसुद्धा तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शालेय बसच्या अपघातात वाढ होत असल्याने पालकांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खोपोलीत अपघात

मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावरील बोरघाट परिसर मृत्यूचा सापळा बनला असल्याचे बनत चालला असल्याचे चित्र असून सरासरी दरोज अपघात आणि त्यात जिवीत हानी होत असल्याचे निदर्शनास येते. याच बोरघाटात खोपोलीतील अंडा पॉईंटनजिक चेंबूर येथील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांच्या लक्झरी बसला भीषण अपघात होत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य विद्यार्थ्यांपैकी अनेकांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे तर काही जण किरकोळ प्रमाणात जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एक सदरची दुर्घटना घडली. या बसमध्ये एकूण ४८ विद्यार्थी आणि दोन शिक्षक होते. चेंबूर येथील मयांक या खाजगी क्लासचे विद्यार्थी लक्झरी बस बस(एमएच०४/जीपी २२०४) मधून लोणावळ्यातील ‘वेट न्ड जॉय’ येथे आले होते. परतीचा प्रवास करताना बस खंडाळा घाटातील अंडा पॉईट जवळील वळणावर असली असता हा अपघात झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -