16 महिन्याच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी आई-बापाला फाशी, सोलापूर सत्र न्यायालयाचा निर्णय

Parents sentenced to death for unnatural atrocities on 16-month-old girl,
16 महिन्याच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी आई-बापाला फाशी, सोलापूर सत्र न्यायालयाचा निर्णय

सोळा महिन्याच्या मुलीवर बापाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून यानंतर तिचा गळा आवळून खून बापाने खून केला. यात पाशवी प्रकारात बाळाच्या आईने आरोपीला सहकार्य केले होते. या दोन्ही अत्याचारी आई बापाला सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

वेगळे वळण देण्याचा प्रयत्न –

आरोपींकडून वारंवार या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण गुन्हा गंभीर आणि क्रूर असल्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून न्यायालयाने योग्य निर्णय दिला. सर्वात महत्वाचे म्हणजे पाच महिन्यांच्या कालावधीत कोर्टाने ही शिक्षा सुनावली धोलाराम विष्णोई आणि त्याची पत्नी पुनीकुमारी बिष्णोई अशी या दोन आरोपींची नावे आहेत. 3 जानेवारी 2022ला ही घटना समोर आली. सिकंदराबाद येथे खून करून राजस्थानमध्ये मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी जात असताना सोलापूर लोहमार्गा पोलिसांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमध्य़े 3 जेनावारीला पती पत्नीला ताब्यात घेतले.

वैद्यकीय तपासणीत सत्य आले समोर –

मृतदेहाचा वास येऊ नये अथवा कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसच्या एसी डब्यातुन प्रवास सुरू केला होता. मात्र, सिकंदराबाद पासून बाळ रत नाही किंवा उठत नाही यामुळे डब्यातील प्रवाशांना संशय आला. प्रवाशांनी तिकीच निरीक्षकाला याची माहिती दिली. त्यानंतर सोलापूर रेल्वे स्थानकावर आली असता पती पत्नीला खाली उतरवून त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी बाळ आजारी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी बाळाचा ताबा घेऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाळाच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून खून झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून प्रदीपसिंह रजपूत यांनी काम केले.