भाग 4 : किशोरवयीन मुले सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात

नाशिक : किशोरवयीन मुलामुलींना महिला हेरून त्यांना सायबर जाळ्यात अडकवत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा ते त्यांचे शोषण करुन ब्लॅकमेल करतात. त्यांना भीती दाखवून अश्लिल कृत्य करवून घेत आहेत. त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये सायबर सिक्युरिटीविषयी जागृती करणे ही शिक्षकांसह पालकांची जबाबदारी आहे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ व सायबर तज्ज्ञांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केले.

अल्पवयीन मुले नकळत विविध गुन्ह्यांमध्ये अडकताना दिसत आहेत. अनेक मुलेमुली आभासी जगात असून, शेकडो व्यक्तींशी फ्रेंडशिप करणे आणि ते आपले विश्व असल्याचे समजून वावरत आहेत. त्यातून मुलामुलींना अनोळखी व्यक्ती हेरून ब्लॅकमेल करत आहे. अनोळखी व्यक्ती किशोरवयीन मुलामुलींमधील शारीरिक व मानसिक बदल ओळखून अश्लिल संवाद साधतात. त्यातून मुले भावनिक होताच त्यांना बॅल्कमेल करुन अश्लिक कृत्य करण्यास भाग पाडत आहे. त्याचा व्हिडीओ व फोटो अनोळखी व्यक्ती सेव्ह करुन ठेवतात. त्याआधारे मुलांना ब्लॅकमेल करत आहेत.

परिणामी, मुले समोरील व्यक्ती सांगेल तसे करत आहेत. त्यातून किशोरवयीन मुलामुलींची आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. हे टाळण्यासाठी पालक व शिक्षकांनी मुलामुलींशी संवादी राहिले पाहिजे. बदलत्या काळातील तंत्रज्ञान गरजेसाठी असले तरी त्याचे दूरउपयोग काय आहेत, हे सांगितले पाहिजे. शाळा आणि कॉलेजमध्ये अधिकृत सायबर सुरक्षा अभ्यासक्रम असला पाहिजे. मुलांना विविध विषयांमध्ये कुतूहल आणि लक्ष देण्याची किंवा स्वीकारण्याची इच्छा असते. ते त्यामध्ये ऑनलाईनसुद्धा सहभागी होऊ शकतात. मात्र, योग्य काय आहे आणि काय अयोग्य आहे हे त्यांना माहिती नसते. ते चुकीच्या मार्गाला लागले तर गुन्हेगारीकडे कधी आणि कसे वळाले हे पालकांना समजणार नाही, असे सायबरतज्ज्ञ दीक्षित यांनी सांगितले.

किशोरवयीन मुले इंटरनेटचा कसा वापर करता, याची माहिती पालकंनी ठेवावी. अनोळखी व्यक्ती मुलांना बॅल्कमेल करुन अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडत आहेत. पालकांनी मुलामुलींशी मनमोकळेपणे संवाद ठेवाव. त्यातून मुले सायबर जाळ्यात अडकणार नाहीत. : तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

किशोरवयीन मुलामुली सोशल मीडियाच्या आहारी गेली असून, त्यांना अनोळखी व्यक्ती अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडत आहे. तेे टाळण्यासाठी पालकांनी मुलामुलींशी संवाद ठेवला पाहिजे. : डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञ