घरमहाराष्ट्रनवी मुंबई मेट्रोचे डिसेंबरमध्ये अंशत: उद्घाटन, CIDCO च्या संचालकांची घोषणा

नवी मुंबई मेट्रोचे डिसेंबरमध्ये अंशत: उद्घाटन, CIDCO च्या संचालकांची घोषणा

Subscribe

एकविसाव्या शतकातील आधुनिक शहरातील ड्रीम प्रकल्प म्हणून नवी मुंबई मेट्रोकडे पाहिले जाते. या नवी मुंबई मेट्रोचे येत्या डिसेंबरमध्ये अंशत: उद्घाटन केले जाणार आहे. अशी घोषणा सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हपमेंट कॉर्पोरेशनचे (CIDCO) व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केली आहे. या मेट्रो मार्गिकेची चाचणी आणि रचना आरडीएसओद्वारे केली जात आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. संजय मुखर्जी यांनी एका मुलाखतीत बोलताना, नवी मुंबई मेट्रो कामांवर लक्ष केंद्रित केले, तसेच नवी मुंबई मेट्रो तीन रेल्वे स्थानकांना जोडली जाणार आहे. यात दोन स्थानिक नेटवर्कचा देखील समावेश आहे. यातून वाहतूकीसाठी एक मोठी साखळी निर्माण केली जाऊ शकते. असे सांगितले.

- Advertisement -

मेट्रो कामांसाठी महा मेट्रोची स्थापना

सिडकोने बेलापूर ते पेंधरपर्यंच मेट्रो लाईन १ चे उर्वरित कामांसाठी महा मेट्रोची स्थापना केली आहे. यात मेन वायडक्ट, डिपो अप्रोच वायडक्ट, डिपो-कम-वर्कशॉपचे काम पूर्ण केले जाईल. तर मेट्रो स्टेशनचे काम, लिफ्ट, एस्केलेटर, फर्निचर आणि सिस्टमचे काम प्रगती पथावर आहे. अलीकडे RDSO पेंधर ते सेंट्रल पार्कपर्यंत ५.१४ कि.मीचे अंतरावर पार करत एक ऑस्किलेशन चाचणी घेत आपात्कालीन परिस्थितीत संदर्भात आढावा घेण्यात आला. 2011 साली सुरू झालेल्या या मेट्रो मार्गावर 11 रेल्वेस्थानक उभारण्यात येणार होते.

या मेट्रो स्थानकांचे जवळपास सर्व विकास कामं पूर्ण झाली आहेत. मेट्रो स्टेशन 1 आणि 3 चा मार्ग अनुक्रमे बेलापूर स्टेशनपासून उपनगरी रेल्वे स्थानक खारघर पर्यंत जोडला आहे. याव्यतिरिक्त तळोजा स्टेशनला सेंट्रल रेल्वेच्या दिवा-पनवेल मार्गावरील कोकण रेल्वे मार्गावर जोडण्यात आला आहे.

- Advertisement -

सहा डब्ब्यांसह धावणार मेट्रो 

आठ मिनिटांच्या अंतराने तीन डब्ब्यांची एक मेट्रो धावेल. यात प्रवाशांची संख्या वाढल्यास भविष्यात तीनवरून सहा डब्ब्यांची एक मेट्रो धावणार आहे. मात्र वेळेतही तीन मिनिटांनी वाढ करण्यात येईल.


Hyderabad girl rape and murder: रेल्वे ट्रॅकवर आढळला आरोपीचा मृतदेह


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -