घरमहाराष्ट्रकार्यकर्त्यांनी पक्षासाठी जमिनी विकाव्या - जानकर

कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जमिनी विकाव्या – जानकर

Subscribe

कार्यकर्त्यांनी वेळ पडल्यास स्वत:च्या जमिनी विकाव्या आणि पक्षाची कार्यालयं स्थापन करावीत असा अजब सल्ला दिला आहे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी.

कार्यकर्त्यांनी वेळ पडल्यास स्वत:च्या जमिनी विकाव्या आणि पक्षाची कार्यालयं स्थापन करावीत असा अजब सल्ला दिला आहे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी. सांगलीमध्ये पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत असताना त्यांनी हा अजब सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे. आपला पक्ष शून्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाटकं बंद करावीत. दोन दिवसामध्ये श्रीमंत होण्याची कोणतीही योजना पक्षात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जमिनी विकून पक्ष कार्यालय स्थापन करावं. असं अजब वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे. शिवाय, पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांची औकात चौकात तरी दाखवावी अशी पुष्टी देखील त्यांनी यावेळी जोडली आहे. यापूर्वी देखील महादेव जानकर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी कार्यकर्ते २५ हजार द्यायला तयार असल्याचं बोलत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -