घरक्राइमटेरर फंडिंग प्रकरणात एटीएसकडून परवेज झुबेरला अटक

टेरर फंडिंग प्रकरणात एटीएसकडून परवेज झुबेरला अटक

Subscribe

टेरर फडिंगच्या प्रकरणात परवेज झुबेरला महाराष्ट्र एटीसकडून अटक करण्यात आली आहे. एटीएसने परवेझ झुबेरला युएपीए (UAPA) अंतर्गत अटक केली आहे. याप्रकरणी परवेज झुबेरला 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे.

टेरर फडिंगच्या प्रकरणात परवेज झुबेरला महाराष्ट्र एटीसकडून अटक करण्यात आली आहे. एटीएसने परवेझ झुबेरला युएपीए (UAPA) अंतर्गत अटक केली आहे. याप्रकरणी परवेज झुबेरला 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे. परवेजला मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. (parvez zubair arrested by maharashtra ats in terror fudging case)

परवेज झुबेर हा डी कंपनीसाठी टेरर फंडिग करण्यासाठी पाकिस्तानातील अंनिस इब्राहिमसोबत संपर्कात होता. शिवाय, परवेज वेगवेगळ्या नावाने डी कंपनीसाठी ओळखला जात होता. मागील बऱ्याच वर्षापासून परवेज फरार होता. अखेर त्याला राहत्या घरातून अटक करण्यात आली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, परवेजचा अंमली पदार्थाच्या धंद्यातून आणि इतर बेकायदेशीर कृत्यांमधून पैसे जमा करत होता. या पैशांचा वापर तो देशात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी वापरत असल्याचे आढळून आले. परवेज बऱ्याच वर्षांपासून दाऊद इब्राहिम गँगशी संबधित असून तो खंडणी आणि बऱ्याच गुन्ह्यांमध्ये फरार होता.

परवेज हा अनीस इब्राहिमच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एटीएसच्या पथकाने सापळा रचून परवेजला अटक केली. तसेच, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण : संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांनाही ईडीचा समन्स

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -