घरताज्या घडामोडीविमान उतरण्याआधीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून अटकेची कारवाई

विमान उतरण्याआधीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून अटकेची कारवाई

Subscribe

मागील काही दिवसांपासून विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या विचित्र वागणुकीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. विमान उतरण्याआधीच एका प्रवाशाकडून इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार मुंबईत घडला. यावेळी पोलिसांनी या प्रकरणी एका प्रवाशाला अटक केली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमान उतरणार होते. परंतु एका प्रवाशाने विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. या प्रवाशाविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानातील क्रू मेंबर्सनी या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे विमान नागपूरहून मुंबईला आलं होतं. इंडिगो विमान ६ई-४२७४ च्या वरिष्ठ केबिन क्रूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजता हे विमान नागरपूरहून मुंबईत दाखल झालं होतं. परंतु विमान उतरण्याआधीच कोणीतरी आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, असं इंडिकेटरद्वारे क्रू मेंबर्सना समजलं. ही गोष्ट समजल्यानंतर केबिन क्रूने याबाबतची माहिती कॅप्टनला दिली. त्यानंतर या प्रवाशाबद्दल तक्रार करण्यात आली. दरम्यान, भारतीय दंड विधानातील कलम ३३६ आणि इतर कलमांतर्गत या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. यावेळी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी १० डिसेंबर रोजी इंडिगो फ्लाइटचं इमर्जन्सी गेट उघडलं होतं. याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश देखील दिले होते. मात्र, या प्रकरणानंतर त्यांनी माफी मागितली होती, अशी माहिती केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा : काही सांगण्यासारखं नाही म्हणून ईडी सरकारकडून रिवाइंड, प्ले काम; सुप्रिया सुळेंचं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -