घरताज्या घडामोडीअलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली; ८८ प्रवासी सुखरुप

अलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली; ८८ प्रवासी सुखरुप

Subscribe

अलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाल्याची घटना घडली होती. मात्र, सुदैवाने या बोटीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबाग मांडवा जेट्टी येथे येणारी अजंठा कंपनीच्या मालकीची अल फथेह प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने या बोटीतील ८८ प्रवासी सुखरुप असून त्यांना वाचवण्यात यश आले आहे. आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

- Advertisement -

गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सकाळी ९ वाजता अल फथेह बोट सुटली होती. मांडावा बंदरा जवळ २०० मीटर अंतरावर असताना बोट बुडू लागली. बोट बुडत असल्याचे पाहताच प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या घाबरलेल्या प्रवाशांना पोलिसांच्या सद्गुरू कृपा या पेट्रोलिंग करणाऱ्या बोटीने तातडीने बाहेर काढण्यात आले. या बोटीतील ८८ जणांना सुखरूप मांडावा बंदरावर उतरवले आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून हे सारे जण बचावले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केले पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाचे कौतुक

बोटींतील महिला आणि बालकांसह ८८ जणांना वाचविणाऱ्या रायगड पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील जवानांच्या धाडसाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता राबविण्यात आलेले बचाव कार्य आणि त्यासाठीच्या प्रसंगावधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सागरी सुरक्षा दलाच्या या कार्यक्षमतेला दाद दिली आहे.

- Advertisement -

मांडवा जेट्टीपासून एक किलोमीटर अंतरावर असताना अचानक बोट बुडू लागल्याने महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांनी मदतीसाठी हाका देणे सुरु केले. या मदतीच्या हाकेला गस्तीवर असलेल्या रायगड जिल्हा पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील सद्गगुरू कृपा बोटीवरील पोलीसांनी तत्परतेने प्रतिसाद दिला. या दलातील प्रशांत घरत यांनी ट्रॉलरवरील तांडेल आणि खलाशांची मदत घेऊन बुडणाऱ्या पुरुष, महिला आणि बालके अशा ८८ जणांना गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. सुटका झालेल्या सर्व प्रवाशांना जेट्टीवर पोहचताच पोलीस दलाच्या कार्यतत्पर मदतीसाठी आभार मानले. रायगड पोलीस दलातील सागरी सुरक्षा दलातील कर्मचारी घरत आणि सहकाऱ्यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता आणि धाडसाचे कौतुक होत आहे.


हेही वाचा – करोना संबंधित अफवांमुळे गोंधळ; सोशल मीडियावर अक्षरश: अफवांचा पाऊस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -