घरमहाराष्ट्रबेस्ट आता 'काट्यावर' धावणार

बेस्ट आता ‘काट्यावर’ धावणार

Subscribe

बेस्ट बस घड्याळ्याच्या काट्यावर धावणार आहे. इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीमएमएस) ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. यंत्रणेमुळे आता बस किती वाजता येणार सहज कळणार आहे.

मुंबईचा प्रत्येक नागरिक घड्याळ्याच्या काट्यावर धावणार असतो. त्याची सकाळच घड्याळ्याच्या काट्यानुसार सुरु होते. मात्र आता बेस्टची बस देखील घड्याळ्याच्या काट्यावर धावणार आहे. बस थांब्यावर अनेक प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असतात. मात्र बस वेळेत येत नाही आणि प्रवाशांचा खोळंबा होतो. मात्र आता ‘बेस्ट’च्या प्रवाशांना बेस्ट टाइम कळणार आहे. बस किती मिनिटांत येईल याची अचूक माहिती देणार तंत्रज्ञान बेस्ट आणणार आहे. इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीमएमएस) यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यामुळे बस थांब्यावर किती वेळात येईल याची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी येणार ११० कोटींचा खर्च

बेस्टच्या बसगाड्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडत असल्याने प्रवाशांना बस थांब्यावर तासनसात वाट पहावी लागते. गेल्या काही वर्षांमध्ये वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांनीही बेस्ट बसची वाट पाहणे सोडले. अनेक प्रवाशांनी कॅब, रिक्षा यांनी जाण्याचा पर्याय निवडला. यामुळे बेस्टचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे टाळण्यासाठी आणि पुन्हा बेस्टचा प्रवासी बेस्टकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीमएमएस) यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय बेस्टने घेतला असून या प्रकल्पासाठी ११० कोटी २४ ला इतका खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत आर्थिक साहाय्य देण्यास हात आखडता घेणाऱ्या पालिका प्रशासनाने यावेळेस पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. पहिल्या टप्प्यात बसमध्ये एलईडी डिस्प्ले सीस्टिम, तर बस थांब्यांवर एलईडी सीस्टिम बसविणे, बसगाड्यांवर व्हेइकल ट्रेकिंग बसविणे इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांचे तीन कोटी सात लाख रुपये महापालिका देणार आहे.

- Advertisement -

बस येण्याची अचूक माहिती मिळणार

या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना आता बस नेमकी कधी येणार याची अचूक माहिती मिळणार आहे. यामध्ये आगार, गाड्यांचा ताफा, कार्यशाळा याचेही नियोजन करण्यात येणार आहे. वेळापत्रक, प्रवासी नोंदणी, वाय – फाय, सीसीटीव्ही, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आगरातून बस बाहेर पडण्याची – येण्याची वेळ, वेग, ठिकाण आदींची माहिती संग्रहित होणार आहे. याचा बेस्ट व्यवस्थापनास नियोजनासाठी त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे एखाद्या थांब्यावर प्रवाशांची संख्या अधिक असल्यास तेथे जादा बसच्या फेऱ्या सोडण्यात येतील.


वाचा – बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा मार्ग रखडलाच

- Advertisement -

वाचा – बेस्टचे बोगस पास बनविणार्‍या टोळीचा पर्दाफाश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -