Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी डिजिटल सुविधांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना बेस्टमध्ये प्राधान्य

डिजिटल सुविधांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना बेस्टमध्ये प्राधान्य

Subscribe

बेस्ट उपक्रमाच्या ‘बेस्ट चलो अॅप’आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’या डिजिटल सुविधांचा नियमित वापर करणाऱ्या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाने बस सेवेत प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डिजिटल सुविधांचा वापर प्रवाशांकडून अधिक प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा प्रवाशांनाही बस प्रवास करताना अधिक लाभ होणार आहे.

बेस्ट उपक्रमाने, बेस्ट चलो अॅप’आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून डिजिटल पध्दतीने प्रवासभाडे प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे. त्याला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता प्रवाशांना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून ‘बेस्ट चलो अॅप’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’द्वारे प्रवासभाडे अदा करावयाचे आहे. डिजिटल पध्दतीने प्रवासभाडे आकारणीमुळे प्रवाशांना सुट्टया पैशांची अडचण निर्माण होणार नाही.

- Advertisement -

या डिजिटल पध्दतीचा प्रसार आणि वापर मोठया प्रमाणावर होण्यासाठी बेस्ट प्रशासनाने, उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या प्रवाशांकरीता काही अतिरिक्त सुविधा १ मार्चपासून देण्यात येणार आहेत. याअंतर्गत, ‘बेस्ट चलो अॅप’ अथवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’चा अवलंब करणा-या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे. विशेषतः सुरुवातीच्या बसथांब्यांवर अशा प्रवाशांना सर्वप्रथम प्रवेशाची सुविधा राहील. सध्या, गरोदर महिला, दिव्यांग, ज्येष्ठ व्यक्ती आदींना बेस्ट बसगाड्यांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जातो.

तसेच, ‘ऑनलाईन रिचार्ज’च्या सुविधेबरोबरच बसगाडीतील बसवाहकाकडून देखील ‘रिचार्ज’ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या ‘बेस्ट चलो अॅप’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’ या डिजिटल सुविधांचा बेस्ट बसगाडयांमधून प्रवास करणा-या प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : जे यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते आम्ही केलं, नामांतरावरून ठाकरेंची खोचक टीका


 

- Advertisment -