घरमहाराष्ट्रनाशिकओमायक्रॉनचा धोका : प्रवाशांना स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक

ओमायक्रॉनचा धोका : प्रवाशांना स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक

Subscribe

करोनाच्या सर्व नियमावलीची अंमलबजावणी विमानतळ प्रशासन करणार

नाशिक:ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी विमानतळावरील प्रवाश्यांच्या आरोग्य तपासणीबाबतचे आदेश दिले असून त्यांच्याकडून स्वयंघोषणापत्र घेण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

विमानतळावर येणार्‍या प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. येथील प्रवाशांसाठी काही नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी विमानतळ प्रशासनाकडून केली जाते की नाही याची पाहणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली.

- Advertisement -

आतापर्यंत एक प्रवासी यूएसए तर एक जर शारजा येथून आल्याचे सांगण्यात आले. या प्रवाश्यांकडून स्वयंघोषणापत्र लिहून घेण्यात आले असून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांची माहिती संकलित केली जात आहे. यापुढे विमानतळावरील माहिती महापालिकेला कळविण्याचे निर्देशही दिले आहेत.

ओझर विमानतळाची पाहणी करून आढावा घेतला. त्यानुसार सर्व प्रवाशांकडून स्वयं-घोषणापत्र लिहून घेतले जात आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणीही केली जात आहे.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -