घरमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून पटोलेंनी हात झटकले

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून पटोलेंनी हात झटकले

Subscribe

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय घडामोडींमध्ये मोठा भूकंप झाला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना विचारले असता, आमच्याकडे थोरातांचा राजीनामा आलेला नाही असे म्हणत त्यांनी हात झटकले आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय घडामोडींमध्ये मोठा भूकंप झाला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना विचारले असता, आमच्याकडे थोरातांचा राजीनामा आलेला नाही असे म्हणत त्यांनी हात झटकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात असा वाद सुरु होता. ज्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये राज्यात दोन गट पडल्याचे देखील बोलले जात होते. पण यांवर आता शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब थोरात यांनी आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना धक्का दिला आहे. पण याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता, आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आलेला नसल्याचे पटोले यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

थोरातांच्या राजीनाम्याबाबत नाना पटोले यांना प्रसार माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पटोले म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून थोरात आमच्यासोबत नाही. तसेच त्यांचा कोणताही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही. तुमच्याकडे काही असेल तर दाखवा, तसेच जर का ते तुमच्याशी बोलत असतील तर तुम्हीच सांगा, असा टोला पटोलेंनी प्रसारमाध्यमांना लगावला आहे.

- Advertisement -

15 फेब्रुवारीला काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी येत्या 15 तारखेला काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी हायकमांडकडून पक्षातील नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात येणार आहे. तसेच शिक्षण मतदारसंघात निवडून आलेल्या आमदारांचा आणि महाराष्ट्रातील भारत यात्रींचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पटोलेंनी यावेळी दिली.

हेही वाचा – कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप! बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

- Advertisement -

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाळासाहेब थोरात हे नाना पटोले आणि काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते, पण हे खरंच असल्याचे उघड झाल्याने काँग्रेसमध्ये आता राज्यातच दोन गट झाले आहेत, असेच दिसून येत आहे. तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमध्येच राहतात की इतर काँग्रेसच्या नेत्यांसारखे नाराज होऊन इतर कोणत्या पक्षाची वाट धरतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -