घरमहाराष्ट्रPatole vs Fadnavis : 'लाचार, निष्क्रीय, लालची'; पटोलेंवरील टीकेनंतर काँग्रेसचा फडणवीसांवर पलटवार

Patole vs Fadnavis : ‘लाचार, निष्क्रीय, लालची’; पटोलेंवरील टीकेनंतर काँग्रेसचा फडणवीसांवर पलटवार

Subscribe

ठाकरे गटाचे माजी आमदार आणि नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर विरोधकांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत उत्तर देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

मंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. गृहमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा नाना पटोलेंनी समाचार घेतला. त्यावर भाजप महाराष्ट्रने ट्वीट करत पटोलेंना प्रत्युत्तर दिलं. आता भाजप महाराष्ट्रच्या ट्वीटला काँग्रेसने फडणवीसांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एकूणच आज भाजप-काँग्रेसमध्ये ट्वीटर वॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे. (Patole vs Fadnavis Helpless passive greedy Congress hits back at Fadnavis after Patoles criticism)

ठाकरे गटाचे माजी आमदार आणि नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर विरोधकांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत उत्तर देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधकांनी राजीनाम्याची केलेली मागणी राजकीय आहे. विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असे म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

- Advertisement -

फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असे बेजबाबदार वक्तव्य करून त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा यांच्यातील फरकही कळत नाही का? महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिले नाही. भाजपा सरकारमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे, हे NCRB च्या अहवालात म्हटले आहे. अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूरचा पहिला नंबर लागतो. त्यानंतर ठाणे, मुंबई व पुणे या शहरांचा नंबर लागतो अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र भाजपने गृहमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप महाराष्ट्र उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Abhishek Ghosalkar: माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी निरोप!

भाजप महाराष्ट्रच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्वीटमध्ये लिहिले की, नाना पटोले तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, कारण तुमचं मविआ सरकार असताना त्यावेळचे गृहमंत्री काय करत होते? त्यांना तुरुंगात जावं लागलं, 100 कोटी वसुली, ॲंटलिया बाँब प्लॅंट प्रकरण, वाझे की लादेन, मनसुख हिरेन प्रकरण महाराष्ट्रातील जनता अजूनही विसरलेली नाही. असे लिहित तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची झालेली लाचारी आणि हतबलता लोक बघत आहेत. बाकी तुमच्या अकार्यक्षमतेबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनीच अनेकवेळा दिल्लीत जाऊन सांगितलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःची कारकीर्द तपासा, म्हणजे कळेल. अशा शब्दांत नाना पटोले यांच्यावर थेट हल्ला करण्यात आला आहे.

हेही वाचा : Nitish Sarkar: Floor Test आधीच नितीश कुमार सरकारसमोर मोठा पेच; कोण बसणार अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर?

फडणवीस हतबल, निष्क्रीय, लालची….

महाराष्ट्र भाजपने केलेल्या ट्वीट हल्ल्याला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र कांग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट लिहित हतबल, निष्क्रीय, लालची, लाचार अशा शब्दांची लाखोली फडणवीसांना वाहिली. पोस्टमध्ये महाराष्ट्र काँग्रेसने लिहिले की, गृहमंत्री फडणवीस, नाना पाटोले स्वाभिमानी आहेत म्हणून तुमच्या शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करून खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले. आणि तुम्ही सत्तेसाठी लाचार आहात म्हणूनच ज्या अजित पवारांवर संपूर्ण आयुष्यभर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून दादा-दादा करत खुर्च्या उबवत बसला आहात.

तुम्ही लाचार आहात म्हणूनच मुख्यमंत्रीपद दिले नाही तरी उपमुख्यमंत्री बनून बसला आहात. तुम्ही अकार्यक्षम आणि हतबल आहात म्हणूनच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणाऱ्या आमदार गणपत गायकवाडला पक्षातून निलंबीत करू शकत नाहीत. तुम्ही निष्क्रीय आहात म्हणूनच दादर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करू शकला नाहीत. तुम्ही सत्तेचे लालची आहात म्हणूनच वेषांतर करून रात्रभर आमदार फोडत फिरत होतात. अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -