Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Scholership : राज्यातील 40 हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा

Scholership : राज्यातील 40 हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा

Subscribe

2018 पासून शिष्यवृत्तीपासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे 40 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

2018 पासून शिष्यवृत्तीपासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे 40 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता लवकरच शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Paving the way for scholarships for 40 thousand students in the state)

हेही वाचा – HSC Result : बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभाग अव्वल, सर्वाधिक कमी निकाल मुंबई विभागाचा

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक अडचणी, आधार कार्ड नसणे, जातपडताळणी प्रमाणपत्र नसणे या कारणांमुळे 40 हजार विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळालेली नव्हती. पण आता विद्यार्थ्यांना 25 मे ते 25 जून या कालावधीत शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर या अर्जची शहानिशा झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2011-12 ते 2016-17 या कालावधीतील महाईस्कॉल प्रणालीवर नोंदणीकृत पण प्रलंबित तसेच 2017-18 वर्षातील ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आलेल्या इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमातीतील 6 हजार 39 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित होती. 200 महाविद्यालयांमधील या विद्यार्थ्यांना 27 कोटी 57 लाख रुपयांती शिष्यवृत्ती आता देण्यात आलेली असल्याची माहिती अतुल सावे यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

तसेच, ओबीसी कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 18 लाख 67 हजार विद्यार्थ्यांना 2022-23 मध्ये 02 हजार 590 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. 2019 ते 2022-23 मधील शिष्यवृत्ती रकमेचा त्यात समावेश होता. इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 10 विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात होती. पण आता ही संख्या वाढवून 50 करण्यात आली आहे, अशी माहिती ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडून देण्यात आलेली आहे.


हेही वाचा – IPL 2023 : मुंबई अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर, गुजरातसोबत होणार दुसरा क्वालिफायर सामना

- Advertisment -