घरमहाराष्ट्रPawar Family : पवार कुटुंबातील फुटीबाबत शरद पवारांच्या बहिणीचा मोठा दावा, म्हणाल्या...

Pawar Family : पवार कुटुंबातील फुटीबाबत शरद पवारांच्या बहिणीचा मोठा दावा, म्हणाल्या…

Subscribe

शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. हे केवळ निवडणुकीपर्यंत आहे, असा मोठा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर फूट पडलीच. पण त्यासोबतच पवार कुटुंबातही मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांच्या बाजूने त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे. मात्र, अजित पवारांना त्यांच्या कुटुंबियांनी एकटे पाडल्याच्या चर्चा आहेत. परंतु, याबाबत आता शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. हे केवळ निवडणुकीपर्यंत आहे, असा मोठा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. (Pawar Family: Sharad Pawar’s sister’s big claim regarding the split in the Pawar family)

हेही वाचा…Jitendra Awhad : सुप्रिया सुळे तर जिजाऊंची लेक, रुपाली चाकणकरांना जितेंद्र आव्हाडांनी सुनावले

- Advertisement -

शरद पवार यांची बहिण सरोज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, लोकांनी चिंता करू नये. उगीच गट फुटला, पवार कुटुंबात फूट पडली अशी चर्चा करू नका. काही होत नाही. निवडणुका होतील. जे निवडून यायचे आहेत ते येतील. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून घरात येतो. एनडी पाटील आणि शरद पवार हे दोन अत्यंत वेगळ्या डाव्या आणि उजव्या विचारसरणीचे लोक आहेत. पण कधीही आमच्या घरात राजकारण आले नाही.

तसेच, जेव्हा एनडी पाटील निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा माझ्या आईने त्यांना 10 हजार रुपये दिले होते. पण आम्ही कधीच राजकारण घरात आणले नाही. शरद पवारांचे मी पाहिले आहे. स्वत:च्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात सर्वकाही आहे का हे पाहतात. असं सुसंस्कृत कुटुंब असताना तिथे काहीही होणार नाही. मला तसे अजिबात वाटत नाही, असा दावाच सरोज पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. तर, अजित काय बोलला, श्रीनिवास काही बोलले तर ते राजकारणापुरते आहे. निवडणुका संपल्या की सगळे ढग निघून जातील, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आल्याने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर काका-पुतण्यामधील हा दुरावा दूर होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -