घरमहाराष्ट्रपवार साहेबांनी सांगितलं, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल - एकनाथ शिंदे

पवार साहेबांनी सांगितलं, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल – एकनाथ शिंदे

Subscribe

खेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खेड येथे जाहिर सभा घेताना उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. यावेळी त्यांनी सत्तेची लालसा आणि सत्तेच्या खुर्चीची भुरळ पडल्यामुळे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे यांची दोन आठवड्यापूर्वी (५ मार्च) खेड येथील गोळीबार मैदानात सभा झाली होती. त्याच गोळीबार मैदानावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा मुलगा व नातु काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मत मागतात, यापेक्षा दुसरे दुर्देव असू शकत नाही असे वक्तव्य केले. तसेच उद्धव ठाकरेंनी हे सर्व सत्तेसाठी केले आणि शिवसेना पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

- Advertisement -

२०१९ च्या निवडणुकीत भाजपासोबत ताटातुट झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. यावेळी मुख्यमंत्री कोण बनणार यावर चर्चा सुरू झाली. बाळासाहेबांनानंतर उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची जबाबदारी आल्यावर त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवेल, असे वक्तव्य केले होते. हे रामदास कदम, गजानन किर्तीकर, इतर नेत्यांना आणि खासकरून मला माहिती आहे. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावे लागेल असे म्हटल्यावर उद्धव ठाकरेंना सत्तेचा लोभ झाला. त्यांना सत्तेच्या खुर्चीची भुरळ पडली आणि त्यांनी आमच्याकडून वदवून घेतल ‘ठीक आहे मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे,’ असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शरद पवार कृषी मंत्री असताना यांनी काय दिवे लावले असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण २०१९ च्या निवडणुकीनंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवल्यावर वाईट होते ते सर्व चांगले झाले आणि उद्धव ठाकरे जुने सर्व विसरून गेले, असेही शिंदे म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मूग गिळून गप्प बसू लागले. सेक्युलर, सावकर, दाऊद आणि हिंदुत्त्वाचे विषय आल्यावर ते भूमिका बदलायला लागले. त्यामुळे त्यांची जीभ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला देखील कचरू लागल्याचे आम्ही पाहिले आहे.

विधानसभेत मिडियाला बाईट्स देताना अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना डोळा मारल्याचे सर्वांनी पाहिले आहे. पण उद्धव ठाकरेंना मला हे सांगायचे आहे की, तुम्ही ज्याच्यासोबत खेळ, थट्टा, मस्करी, गळ्यात गळे घालतात ते कधी तुमचा गळा दाबतील हे तुम्हालाही समजणार नाही. त्यांचा पूर्व इतिहास एकदा तपासून बघा. नाहीतर शेवटी फक्त ‘हम दो हमारे दो’ एवढेच शिल्लक राहिल, अशी टीकाही एकनात शिंदे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -