Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ओबीसी आरक्षणामध्ये पवार, ठाकरे, थोरात झारीतील शुक्राचार्य ; बावनकुळे यांचा आरोप

ओबीसी आरक्षणामध्ये पवार, ठाकरे, थोरात झारीतील शुक्राचार्य ; बावनकुळे यांचा आरोप

ओबीसी आरक्षणाच्या मुददयावरून बावनकुळे यांचा आरोप

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांना २०२२ पर्यंत ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. म्हणून वेगवगळया भुमिका मांडली जात आहे. असा आरोप करत भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य असून यांनाच ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही असा थेट आरोप करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही शरसंधान साधले.
आज नाशिक येथे भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ओबीसी आरक्षणाच्या मुददयावरून बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सत्ताकाळातच केंद्राने ३ जुलै २०१५ रोजी पत्र पाठवले. इम्पेरिकल डाटात ६९ लाख चुका झाल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारे ओबीसींना आरक्षण दिले होते. यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही राज्य सरकारने लक्ष दिले नाही. राज्यातील महविकास आघाडी सरकार झोपले असून केवळ सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळेच आरक्षण गेले असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
इम्पेरिकल डाटात झालेल्या चुका या युपीए सरकारच्या काळात झालेल्या आहेत. त्यांच्या काळात चुका झाल्यानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते खोटे बोलत असल्याची टीकाही बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.

- Advertisement -

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील मंत्र्यांवर आरोप करतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही शरसंधान साधले. ’ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं विजय वडेट्टीवार बोलतात. छगन भुजबळ मोर्चे काढतात, पण मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार बोलत नाहीत. शरद पवार, बाळासाहेब थोरात ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकाचे चालक आहेत, ओबीसी आरक्षण मिळावे असे त्यांना वाटत नाही ते झरीतील शुक्राचार्य आहेत असा आरोप करतांना त्यांना जर खरचं आरक्षण द्यायचे असेल तर मग त्यांनी तसे जाहीर करावे. तीन महिन्यांत डाटा तयार करून आरक्षण द्यावे भाजपच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करू अन्यथा पुढील काळात रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -