घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपवारांचा निर्णय आणि नाशकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

पवारांचा निर्णय आणि नाशकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा आपला निर्णय अखेर मागे घेतला सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे या निर्णयानंतर भावनिक झाले होते आणि त्यामुळे मी हा निर्णय मागे घेतोय असे मत यावेळी बोलताना शरद पवार यांनी व्यक्त केले तसेच येणाऱ्या काळात दुप्पट ऊर्जेने पक्ष मजबूत करण्यासाठी काम करेल असेही शरद पवार यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेताच राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. नाशिक मध्येही कार्यकर्त्यांनी मोठा आंदोत्सव साजरा केला.

खरतर, मागील तीन दिवसापासून राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठे संभ्रमाचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता शरद पवार यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष दिसून येतोय. ठिकठिकाणी वाजत गाजत नाचत जल्लोष साजरा केला जातोय.

- Advertisement -

नाशिक शहरातील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवन समोर शहरातील कार्यकर्त्यांनी जमून एकच जल्लोष साजरा केला यावेळी एकमेकांना मिठाई भरवण्यात आली तसेच फटाके फोडून आणि जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष साजरा केला. यावेळी ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार, पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हे” अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी रंजन ठाकरे, अंबादास खैरे, बाळा निगळ, मुकेश शेवाळे, योगिता आहेर, सुषमा पगारे, निवृत्ती अरींगले, डॉ संदीप चव्हाण, राहुल कमानकर, ज्ञानेश्वर महाजन, राया गायकवाड, नाना पवार, मनोहर कोरडे, अपर्णा खोत, मंगला मोरे, पुष्पा वाघ आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत शरद पवार साहेबांनी आपला निर्णय मागे घेतला यामुळे आमच्यामध्ये एकच जल्लोष संचारला आहे येणाऱ्या काळात आम्ही दुप्पट जोमाने कामाला लागू व पक्ष बळकट करू : रंजन ठाकरे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 

पवार साहेबांनी राजीनामे मागे घेतानाच असे सांगितले की इथून पुढे मी दुप्पट ऊर्जेने काम करेल पवार साहेबांचे हे शब्दच आमच्यासाठी प्रेरणा ठरतील पवार साहेब हीच आमची ऊर्जा असून साहेबांच्या निर्णय मागे घेण्याच्या निर्णयामुळे आमच्यामध्ये अधिक उत्साह संचारला आहे : अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -