घरताज्या घडामोडीसरपंचांच्या रखडलेल्या मानधनाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मोठा निर्णय

सरपंचांच्या रखडलेल्या मानधनाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मोठा निर्णय

Subscribe

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट चालू आर्थिक वर्षासाठी शिथील करण्यात आली आहे.

सरपंचांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत सरकारने नुकताच आदेश काढला आहे. सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याची सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विभागाला दिल्या आहेत.  या कामासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सरपंचांना सध्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार प्रतिमाह ३ ते ५ हजार रुपये इतके मानधन देण्यात येते. सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित असून ते तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे सरपंचांचे प्रलंबीत मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट चालू आर्थिक वर्षासाठी शिथील करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेले चांगले काम तसेच लॉकडाऊनच्या काळात घटलेली ग्रामपंचायत करवसुली पाहता हा निर्णय घेण्यात आला. या कर्मचाऱ्यांनाही त्यांचे संपूर्ण वेतन देण्याची कार्यवाही राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून करण्यात आली आहे, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -