घरताज्या घडामोडीबालरोगतज्ज्ञांचा जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर

बालरोगतज्ज्ञांचा जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर

Subscribe

कोरोनाची तिसरी लाट : आजारासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजनावर चर्चा

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांच्या सुरक्षिततेसाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजना आणि औषधोपचार याबाबत बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने आपला अहवाल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सूर्पुद केला.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज वैद्यकिय तज्ज्ञांनी वर्तविल्यानंतर लहान मुलांवर उपचार करण्यासाठी काय उपायोजना कराव्या लागतील यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी जिल्हयात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या पथकाने आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात कोविड आजारासंबंधी तीव्रता कमी जास्त असताना करावयाचे उपचार, मुलांची मानसिक अवस्था ठीक राहण्याच्या दृष्टीने घेण्याची खबरदारी, गृह विलगीकरणात असताना नोंद ठेवण्याच्या गोष्टी अशा अनेक मुद्द्यांवर उपाय सुचवले आहेत. डॉ. रवींद्र सोनवणे यांनी नाशिक शहर आणि जिल्हा यातील, बालरुग्णांच्यासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती दिली. तसेच डॉ. पंकज गाजरे यांनी एकूण रुग्ण किती असतील किंवा काय सुविधा लागू शकतील याची कल्पना दिली. डॉ. मिलिंद भराडिया आणि डॉ. रमाकांत पाटील यांनी कोविड आणि कोविदेतर अशी काटेकोर विभागणी लहान मुलांमध्ये करणे व्यवहार्य नाही, हा मुद्दा मांडला. त्यासाठी कोविड साठीची सर्व खबरदारी घेऊन सर्व रुग्णालयांना त्यावर उपचार करण्याची परवानगी देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आयएमए महाराष्ट्र राज्य कृती समिती अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी काही काळात विशेष काळजी घेऊन शाळा सुरू करणे कसे आवश्यक आणि शक्य आहे, या विषयी मत मांडले . बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राज्य सचिव डॉ. सदाचार उजलांबकर यांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील डॉक्टरांचा राज्य कृती दलात समावेश असावा अशी मागणी केली .

उपचार पध्दतींचा करणार अभ्यास
जिल्हाधिकारी यांनी आवश्यक औषधे, यंत्रसामुग्री यांचा अभ्यास करून माहिती सादर करण्यास सांगितले. शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे यांना त्यांनी या मोहिमेचे नेतृत्व करण्यास सांगितले आहे. त्यांची इन्सीडेट कंमाडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर कृती दलाचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी सुचवलेल्या काही गोष्टी सह शासनाला सादर केला जाईल.

- Advertisement -

कृती दलात यांचा समावेश
या कोविड कृती दलामध्ये अध्यक्ष आणि डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग चिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ.रवींद्र सोनवणे, डॉ.सदाचार उजळंबकर, डॉ.रमाकांत पाटील, डॉ.राजेंद्र कुलकर्णी, माजी केंद्रीय उपाध्यक्ष डॉ.केदार माळवतकर, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.मिलिंद भराडिया, डॉ.पंकज गाजरे, डॉ.संदीप वासनकर, डॉ.संजय आहेर, डॉ.सुशील पारख, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.अमोल मुरकुटे, सह सचिव डॉ.अक्षय पाटील, खजिनदार डॉ.गौरव नेरकर आदी सदस्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -