Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र Pegasus Spyware : काही मीडिया संस्थांना चायनीज फंडिंग; फडणवीसांचा मोठा आरोप

Pegasus Spyware : काही मीडिया संस्थांना चायनीज फंडिंग; फडणवीसांचा मोठा आरोप

Related Story

- Advertisement -

देशासह संसदेत फोन टॅपिंग प्रकरण गाजत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडींग होत आहे. ज्याद्वारे बदनामीचा अंजेडा राबवला जात असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरुन पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पेगासस प्रकरणात ४५ देशांचा उल्लेख आहे, पण चर्चा मात्र भारताचीच केली जात आहे, असं म्हटलं. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूनं हे सगळं केलं जात आहे. तसंच, एक-दोन मीडिया हाऊसला चायनिज फंडिग येत आहे. त्याद्वारे एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र आहे, असा आरोप करत अशा बदनामीचा आम्ही निषेध करतो, असं फडणवीस म्हणाले.

माझ्या कार्यकाळात NSO च्या कोणत्याही यंत्रणा आम्ही वापरल्या नाहीत

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात फोन टॅपिंग केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावर देखील फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत NSO च्या कोणत्याही यंत्रणा आम्ही वापरल्या नाहीत. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असं कधीही झालं नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. काही परदेशी एजन्सी भारताला बदनाम करत आहेत. त्याचाच एक भाग आपण बनू नका, असं आवाहनही फडणवीसांनी केलं.

फोन टॅपिंगचे आरोप मनमोहन सिंग यांच्या काळात

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. सपाचे नेते अमर सिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, असं सांगितल होतं. जे काम झालंय ते कायदेशीर झालंय असही त्यांनी सांगितलं होतं, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॅान्ड्रीग रोखण्यासाठी हे फोन टॅप झाल्याच सांगितलं. ते योग्य असल्याचं समर्थन केलं होतं. फोन टॅपिंग होत असल्याची बातमी येणं चुकीचं असून याबाबत पुढे काळजी घेऊ असंही मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं. UPA च्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीर रित्या योग्य आहे हे सांगितलं गेलं, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -