घरमहाराष्ट्रपेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्त; अहवाल सादर करण्याचे आदेश

पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्त; अहवाल सादर करण्याचे आदेश

Subscribe

वक्फ बोर्डातील सदस्य, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक त्यांचे दाऊद इब्राहिम कनेक्शन याबरोबरच यातील एका सदस्याने महिला सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेला बलात्कार असे एकामागोमाग एक आरोप करत संबंधित माहितीचे संभाषण असलेल्या ऑडिओ क्लिपचे पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्याचीच चौकशी आता सीआयडीकडे सोपवण्यात आलीय.

मुंबईः सरकारी वकील प्रवीण चव्हाण पेन ड्राईव्ह प्रकरणात मोठी घडामोड घडलीय. पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आलाय. तसेच राज्याच्या गृह खात्यानं लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेशही दिलेत. गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. यावेळी गिरीश महाजन यांच्याविरोधात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी षडयंत्र रचल्याचं सांगत पेन ड्राईव्ह दिला होता. वक्फ बोर्डातील सदस्य, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक त्यांचे दाऊद इब्राहिम कनेक्शन याबरोबरच यातील एका सदस्याने महिला सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेला बलात्कार असे एकामागोमाग एक आरोप करत संबंधित माहितीचे संभाषण असलेल्या ऑडिओ क्लिपचे पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्याचीच चौकशी आता सीआयडीकडे सोपवण्यात आलीय.

देवेंद्र फडणवीसांचा पहिला पेनड्राईव्ह बॉम्ब

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा पेनड्राईव्ह बॉम्ब विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच नवाब मलिकांच्या जामीनासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कट रचला होता. सरकारी वकील प्रवीण चव्हाण षडयंत्रात सहभागी होते. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही नाव फडणवीसांनी या षडयंत्रात घेतलं आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांचा दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब

अल्पसंख्याक विकास खात्याच्या अखत्यारीतील राज्याच्या वक्फ मंडळावर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींची सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. राज्य सरकारला दाऊदशी संबंधित व्यक्ती का लागतात आणि सरकार त्यांना पाठीशी का घालते, असा सवाल करत फडणवीस यांनी वक्फ मंडळाचे सदस्य डॉ. मुद्दसीर लांबे आणि सध्या अटकेत असलेला महम्मद अरशद खान यांच्यातील संभाषणाचा पेनड्राईव्ह सभागृहात सादर करून सरकारवर नवा बॉम्बगोळा टाकला होता. हा पेनड्राईव्ह फडणवीस यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना सुपूर्द केला होता.


हेही वाचाः वक्फ मंडळावर दाऊदशी संबंधित व्यक्ती; फडणवीसांचा दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब!

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -