घरताज्या घडामोडी12 वर्षं उलटली तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण; संतापलेल्या कोकणवासीयांचा 'रास्ता रोको'

12 वर्षं उलटली तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण; संतापलेल्या कोकणवासीयांचा ‘रास्ता रोको’

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने अपघातही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी आज या भागातील संतापलेल्या कोकणवासीयांनी रास्तारोको केले.

गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने अपघातही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी आज या भागातील संतापलेल्या कोकणवासीयांनी रास्तारोको केले. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. (Pen Raigad Mumbai Goa Highway Rasta Roko Movement)

मिळालेल्या माहितीनुसार, मागील 12 वर्षांपासून मुंबई-गोवा या महामार्गावरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरु असून, या कामामुळे नेहमीच अपघात होत असतात. या महामार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातात 18 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या महामार्गावरील वाहतूक अडवून पेणकरांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.

- Advertisement -

‘माझं पेण’ या सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. रास्ता रोको आंदोलन करत या नागरिकांनी कामाला दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्या 12 वर्षांत आतापर्यंत बरेच अपघात या रस्त्यावर झाले आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी जीव घेणे ठरत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मंत्री महोदयांच्या उपचारांदरम्यान रुग्णालयात ‘बत्तीगुल’; केला ‘हा’ उपाय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -