घरमहाराष्ट्र'या' दिवशी राडा केल्यास होईल शिक्षा

‘या’ दिवशी राडा केल्यास होईल शिक्षा

Subscribe

६ डिसेंबर ते ११ डिसेंबर या काळात वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षातर्फे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलन, उपोषण केले जाते. त्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परिनिर्वाण दिनाला आता दोन दिवस उरले आहेत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे अनुयायी देशभरातून चैत्यभूमीकडे येत असतात. याकाळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असते. बाबासाहेंबाच्या महापरिनिर्वाणदिनानंतर ८ डिसेंबर रोजी नक्षल संघटनेतर्फे पीएलजीए सप्ताह पाळण्यात येतो. याकाळात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी कलम ३७ (१) (३) संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हे कलम लागू करण्यात आले आहे.

 हे माहित आहे का? – शताब्दी हॉस्पिटलात उभारणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा

कायदा आणि सुव्यवस्था राखली जाणार

६ डिसेंबर ते ११ डिसेंबर या काळात वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षातर्फे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलन, उपोषण केले जाते. त्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते. अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाऊन गंभीर परिस्थिती निर्माण होते. अशा कालावधीत कोणत्याही संदिग्ध वस्तू स्वत:सोबत बाळगता येणार नाही. तसे केल्यास शिक्षाही होऊ शकते.

- Advertisement -
वाचा- नक्षलवाद्यांची गडचिरोलीमध्ये पुन्हा जाळपोळ!

काय आहे हे कलम ?

कलम ३७ (१) आणि (३) अंतर्गत तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेवर बाधा आणणाऱ्या कोणत्याही वस्तू बाळगू शकत नाही. या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा शारिरीक इजा करणाऱ्या कोणत्याही वस्तू वापरता येणार नाही. या शिवाय इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणतेही दाहक पदार्थ, स्फोटके बरोबर नेणे, क्षेपणास्त्रे किंवा फेकण्याची उपकरणे नेणे बाळगणे या सगळ्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. असे केल्यास त्या व्यक्तिला किंवा समूहाला शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे आदेश गडचिरोलीतील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

वाचा –डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्रासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही – धनंजय मुंडे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -