घरमहाराष्ट्रPension Scheme : हीच संकल्पना राबवण्याचा विचार करा..., रोहित पवार यांची शासनाला...

Pension Scheme : हीच संकल्पना राबवण्याचा विचार करा…, रोहित पवार यांची शासनाला विनंती

Subscribe

मुंबई : एक 70 वर्षीय वृद्ध महिला पेन्शनचे पैसे घेण्यासाठी खुर्चीच्या मदतीने भर उन्हात अनवाणी पायपीट करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडीओची दखल घेत भारतीय स्टेट बँकेवर (SBI) ताशेरे ओढले आहेत. याच संदर्भात आपण अधिवेशनात पेन्शन स्कीमचा (Pension Scheme) मुद्दा उपस्थित केला होता, याचे स्मरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला करून दिले आहे.

व्हायरल व्हिडीओत दिसणारी ही महिला ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील असून ही घटना 17 एप्रिलची आहे. तिचे नाव सूर्या हरिजन असून तिचा मोठा मुलगा परप्रांतीय मजूर असल्याने ती तिच्या लहान मुलासोबत राहते. हा लहान मुलगा इतर लोकांच्या गुरांना चरण्याचे काम करतो आणि कुटुंबाकडे स्वत:च्या मालकीची कोणतीही जमीन नसून ते झोपडीत राहतात. सीतारामन यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आणि आर्थिक सेवा विभाग (DFS) आणि स्टेट बँकेने अशा प्रकरणांमध्ये दखल घ्यावी, असे सांगत लोकांशी मानवतेने वागण्याची अपेक्षा व्यक्त केली.

- Advertisement -

याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. पेन्शन योजनेची रक्कम काढण्यासाठी ओडिशामधील एका आजीला खुर्चीच्या आधाराने पायी चालत जावे लागत असल्याची बातमी वाचनात आली. मुळात या योजनेचे लाभार्थी एक तर ज्येष्ठ नागरिक, एकल महिला किंवा दिव्यांग आहेत. त्यामुळे या योजनांच्या मदतीची रक्कम घरपोच देणे गरजेचे आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

पोस्टाद्वारे ही रक्कम घरपोच देण्याची मागणी मी अधिवेशनात केली होती. जळगाव जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘पेन्शन आपल्या दारी’ हे अभियान राबवत पोस्टाद्वारे पेन्शन देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हीच संकल्पना राज्यात राबविण्याबाबत शासनाने विचार करावा, अशी विनंती देखील आमदार पवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -