मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कथित भाजपा नेत्याचा एक फोटो ट्वीट करत महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असे शीर्षक देत भाजपवर हल्ला चढवला. संजय राऊतांच्या या ट्वीटला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मात्र संजय राऊत यांनी आज (21 नोव्हेंबर) पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळेंवर टीकास्त्र सोडले. (People of BJP had a good day Sanjay Raut again attacked in the casino case Chandrashekhar Bawankule)
हेही वाचा – नरेंद्र मोदी अन् आदित्य ठाकरेंचा ब्रॅण्ड एकच; संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा
संजय राऊत म्हणाले की, तिथे काय निसर्गरम्य थंड हवेचं वातावरण आहे का, तर असं नाही. मकाऊ असेल, बँकॉक असेल जायला हरकत नाही, माणसाने या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, अनुभव घेतला पाहिजे, पाहिलं पाहिजं, निरिक्षण केलं पाहिजे. अशा ठिकाणी जाऊन बसणं हा सुद्धा गुन्हा नाही. मी सुद्धा म्हटलेलं नाही की, हा गुन्हा आहे. पण तुम्ही खोट बोलता हा गुन्हा आहे. तो मी नव्हेच, मी तिथे पिझ्झा खायला गेलो होतो. परंतु माझ्याकडे व्हिडीओ आहेत, मी देऊ शकतो, असा इशारा संजय राऊत यांनी पुन्हा एकदा दिला.
संजय राऊत म्हणाले की, मकाऊला मी सुद्धा गेलो आहे. खूप वर्षांपूर्वी मकाऊची जेव्हा उभारणी सुरू होती. तेव्हा एक गाव कसं उभं राहतं हे मी पाहिलं आहे आणि सामनात त्यावरती लिहिलं आहे. पण आपण जबाबदार लोकं आहोत आणि महाराष्ट्रात काय चाललं आहे, हे माहित असतानाही तुम्ही तिथे जाऊन इथे येता आणि विरोधकांना ज्ञान देता. खरं तर भारतीय जनता पक्षाला हे अंगावर ओढून घ्यायची गरज नव्हती.
हेही वाचा – होय, आम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत अन् विकृत; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर
प्रत्यक्षदर्शी सांगतो आहे की, त्या फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटी रुपयांचे पोकर्स विकत घेतले. पोकर्स ही करन्सी आहे, ते मला नंतर कळलं. त्याच्यासमोर पिझ्झा नाही, पोकर्स आहे, हे मला सांगितलं गेलं. त्याच्यसोबत आणखी लोकं होते. त्यांनीसुद्धा दोन-तीन करोडचे पोकर्स खरेदी केले. जर भाजपा सांगते की हे आमचे नेते आहेत, याचा अर्थ महाराष्ट्रातील, देशातील जनतेला नाही पण तुमच्या लोकांना चांगले दिवस आले आहेत.