घरताज्या घडामोडीगणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना करावी लागणार कोरोना टेस्ट

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना करावी लागणार कोरोना टेस्ट

Subscribe

जिल्ह्याचे प्रवेशद्वार ,रेल्वे,बस स्थानक,चेक पोस्टवर आरोग्य पथके तैनात ठेवणार

श्रावण महीना सुरु झाला की कोकणी माणसाला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाचे. येत्या १० सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. महानगरांमध्ये कामनिमित्त असलेला चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी परततो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी दोन लाखाहून अधिक चाकरमानी गणेशोत्सवाला येतील असे अपेक्षित धरुन त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने जोरदार पूर्व तयारी सुरू केली आहे. सर्व चाकरमारमान्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचे प्रवेशद्वार, प्रत्येक रेल्वे व बस स्थानक, चेक पोस्टवर आरोग्य पथके तैनात ठेवली जाणार आहेत. व त्यासाठी आवश्यक नियोजन सुरू झाले आहे.

मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव वाढला होता याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा आतापासूनच अलर्ट केली आहे. मागील वर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने व गावा-गावातून घेण्यात आलेली खबरदारी यामुळे चाकरमान्याना गावी येता आल नाही. यावर्षी परिस्थिती नियंत्रणात असल्याने गणेशोत्सवला मोठ्या संख्येने चाकरमानी येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबईत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यतही कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाला येणाऱ्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. सर्व रेल्वे बुकिंग फुल झाली आहेत. एसटी व खाजगी बस सुद्धा मोठ्या प्रमाणावर बुक झाल्या आहेत. त्यामुळे दोन लाखाहून जास्त चाकरमानी गणेशोत्सवाला सिंधुदुर्गात येतील असे जिल्हा प्रशासनाने अपेक्षित धरले आहे

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमाऱ्यांना साठी निर्बधा बाबत जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली असता, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून, पुढील आठवड्यात याबाबत निर्बंध काय असतील याची माहीती जाहीर केली जाणार आहे. मात्र मुंबईत व सिंधुदुर्ग मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी किंवा कोरोना लसीचे दोन डोस अनेक लोकांनी घेतले असले, तरी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक चाकरमान्याला कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. कोरोना टेस्ट करून घेण्यास विरोध न करता कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी सहकार्य केल्यास निश्चितच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळता येईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा : अशोक चव्हाणांना देणार ‘विश्वासघातकी पुरस्कार; मराठा आरक्षणाच्या राज्यव्यापी बैठकीत निर्णय


 

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना करावी लागणार कोरोना टेस्ट
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -