पुणे : “लोकांमधला राग मतपेटीत उतला पाहिजे”, अशी आक्रमक प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्यांवर दिली आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे दौऱ्यावर आहे. यात पुण्यातील हडपसरमधील मनसेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे, मनसेचे खड्ड्यांविरोधातील आंदोलन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि आदी मुद्यांवरून माध्यमांशी संवाद साधळा.
राज ठाकरे म्हणाले, “मला आश्चर्य वाटते की, जनता ज्या लोकप्रतिनिधी निवडून येते. ते तुमच्यासमोर रस्त्यांवरील खड्डे हे प्रश्न उपस्थितीत करतात आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्याच लोकांना निवडून देतात. मग, जातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर निवडून देता. यामुळे तुमचे हे प्रश्न सुटणार नाहीत. लोकांच्या मनातील राग हा जोपर्यंत मतपेटीत उतरत नाही, त्यांच्या विरोधात तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत.”
आंदोलनातून सरकारची डोळे उघडतील
राज ठाकरे पुढे म्हणाले, “यापूर्वी मनसेने अनेक विषयांवर अनेकदा आंदोलन केली. पण पदरी काय पडले आणि जे महाराष्ट्राचे नुकसान करतात. त्या लोकांना तुम्ही निवडून देता. मला तर यांचे आश्चर्य वाटते. पुण्यात आंदोलन सुरू आहेत. पुण्यात आतापर्यंत 16 आंदोलन केली आहेत. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक रस्त्यावर आंदोलन होतील. सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनातून सरकारची डोळे उघडतील, अशी अपेक्षा आहे.”
हेही वाचा – खळ्ळखट्याक : राज ठाकरेंचा सकाळी आदेश; कार्यकर्त्यांनी दुपारी कंपनीचे ऑफिस फोडले
लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या
आंदोलनाचे स्वरुप कसे असे, पुन्हा खळखट्याक सुरू, पत्रकारांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “प्रत्येक जण हे वेगवगळ्या पद्धतीने आंदोलन करतील. मी सगळ्यांना सांगितले की, सगळ्या ठिकाणी काही तोडफोड करण्याची गरज नसते. लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असे कार्यकर्त्यांना सांगितल्याचे राज ठाकरेंनी म्हणाले. आंदोलन ज्यांच्यासाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको, यामुळे अनेक ठिकाणी दक्षता घेण्यात आलेली आहे,” असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा – Mumbai-Goa Highway : राज ठाकरेंचे भाषण संपताच कार्यकर्ते लागले कामाला; महामार्गावर आंदोलन सुरू
कायद्या नावाच गोष्टी राहिलेली नाही
अनेक पालिकांमध्ये प्रशासकांची आहे, यावर राज ठाकरे म्हणाले, मला असे वाटते की, आपल्याकडे कायद्या नावाच गोष्टी राहिलेली नाही. निवडणुका कधी होणार, त्यांना वाटेल तेव्हा निवडणुका होणार. निवडणुकांसाठी व्यवस्थेवर पुरेसा दबाव नाही.”