Homeताज्या घडामोडीPerfume Bottle Blast : परफ्यूमच्या बाटल्यांवरील तारखा बदलताना स्फोट; 4 जण जखमी

Perfume Bottle Blast : परफ्यूमच्या बाटल्यांवरील तारखा बदलताना स्फोट; 4 जण जखमी

Subscribe

परफ्यूमच्या बटल्यांवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट झाल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. गुरूवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

नालासोपारा : परफ्यूमच्या बटल्यांवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट झाल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. गुरूवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, परफ्यूमच्या बाटल्यांचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. तसेच, जखमी कुटुंबियांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Perfume Bottle Blast while altering expiry dates in nala sopara 4 injured)

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील शंकेश्वर नगरमधील रोशनी अपार्टमेंट या इमारतीत परफ्युमच्या बाटल्यांवरील तारखा बदलताना स्फोट झाला आहे. या इमारतीतील 112 क्रमांच्या खोलीत वडर कुटुंब राहते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास परफ्युम बॉटलवरील तारखा संपल्या होत्या. त्याच बदलण्याचे काम वडर कुटुंब करत होते. यावेळी अचानक त्या बाटल्यांचा स्फोट झाला. या स्फोटात महावीर वडर (41), सुनीता वडर, हर्षवर्धन वडर (9), हर्षदा वडर(14) अशी वडर कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

परफ्युममध्ये असलेल्या गॅसमुळे हा स्फोटा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत पती-पत्नीसह कुटुंबातील दोन मुले असे एकूण 4 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मुलगा हर्षवर्धन याच्यावर नालासोपारा येथील लाईफ केयर रुग्णालय तर अन्य 3 जणांवर ओस्कर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे इमारततीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा – Viral Video : तळघरातून बाहेर पडल्या बारबाला; व्हायरल व्हिडीओवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा