घरताज्या घडामोडीमंगल कार्यालयातील विवाह सोहळयांची परवानगी रदद

मंगल कार्यालयातील विवाह सोहळयांची परवानगी रदद

Subscribe

मंगल कार्यालये, लॉन्स चालकांना विवाह सोहळयांसाठी देण्यात आलेली परवानगी अखेर चोवीस तासांतच मागे घेण्यात आली आहे. १५ मार्चच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानूसार मंगल कार्यालयात विवाह सोहळयांना बंदी असतांना पोलिस आयुक्तांनी पुन्हा स्वतंत्र आदेश काढत कार्यालयात ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळयांना परवानगी दिली होती. यामुळे यंत्रणेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत असून विवाह सोहळयांमधून प्रार्दुभाव वाढत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विवाह सोहळयांवर सुरूवातीला काही निर्बंध घालण्यात आले. पोलिस प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही मंगल कार्यालय चालक तसेच आयोजकांवर दंडात्मक कारवाई देखील केली. मात्र तरीही विवाह सोहळयांमधून गर्दीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने अखेर शासनाने मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळयांना बंदी घातली. विवाह सोहळयांना बंदी नसली तरी, मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळे आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

असे असतांना ५ एप्रिल रोजी नाशिक पोलिस आयुक्तांनी आदेश पारित करत ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळयांना परवानगी दिली. तसेच याकरीता पोलिस परवानगी आवश्यक असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले. मात्र अवघ्या चोवीस तासांत हे आदेश मागे घेण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाने अशा प्रकारे आदेश काढत अधिकच संभ्रम निर्माण केला. मात्र अशा प्रकारची कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त हे देखील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आहेत. प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वीच विवाह सोहळयांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळयांना बंदी आहे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -