पुणे : पेस्ट कंट्रोल बेतले जीवावर; दाम्पत्याचा मृत्यू

पेस्ट कंट्रोलनंतर योग्य ती खबरदारी न घेतल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

pest control cause death of couple at pune
पुणे : पेस्ट कंट्रोल बेतले जीवावर; दाम्पत्याचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यात ढेकूण घालवण्यासाठी केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पेस्ट कंट्रोलकेल्यानंतरचा निष्काळजीपणा जीवावर बेतला आहे. १३ फ्रेबुवारी रोजी पुण्यातील बिबेवाडी परिसरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्याने विषारी वायूने दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील बिबेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधावारी मजली कुटुंबाने पेस्ट कंट्रोल केले होते. घरातील डास, कीटक घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. मात्र, पेस्ट कंट्रोल केल्यानंतर अविनाश मजली (६४) आणि अपर्णा मजली (५४) यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. घराची दारे आणि खिडक्या बंदच ठेवल्याने या दोघांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वीही पुण्यात घडली होती घटना

पुण्यातील भारती विद्यापीठाच्या महाविद्यालयामध्ये दोन तरुण काम करत होते. कॅन्टीन मालकाने दोघा तरुणांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. ढेकणांचा त्रास होत असल्याने त्यांच्या खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे हे दोघेही आपवल्या मित्राच्या घरी तीन दिवस राहण्यासाठी गेले होते. नंतर ते पुन्हा आपल्या खोलीवर आले. सकाळी वेळ होऊनही दोघे तरुण कामावर न आल्याने कॅन्टीन मालकाने खोलीत जाऊन पाहणी केली असता दोघे मृतावस्थेत आढळले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पेस्ट कंट्रोलचा प्रभाव कमी झाला नसल्याने या दोन तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.


हेही वाचा – महामार्गांवरील अपघातात घट