घरट्रेंडिंगपेट्रोल दरवाढीचा पुन्हा भडका, शंभरी गाठणार?

पेट्रोल दरवाढीचा पुन्हा भडका, शंभरी गाठणार?

Subscribe

दरवाढीनुसार, मुंबईमध्ये पेट्रोल ८६.९१ रुपयांवर तर डिझेल ७५.९६ रुपयांवर पोहोचलं आहे. दरम्यान राज्यामध्ये अमरावतीतील पेट्रोलचा दर सर्वात महाग (८८.७१) आहे.

आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. आजच्या वाढीनुसार पेट्रोल १९ पैशांनी आणि डिझेल २१ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे या वाढलेल्या दरानुसार मुंबईमध्ये पेट्रोल ८६.९१ रुपयांवर तर डिझेल ७५.९६ रुपयांवर पोहोचलं आहे. आतापर्यंतचा मुंबईच्या पेट्रोल दराचा हा उच्चांक आहे. या दरवाढीनंतर राज्यामध्ये अमरावतीतील पेट्रोलचा दर सर्वात महाग आहे. अमरावतीकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी तब्बल ८८.७१ रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान गगनाला भिडलेले हे पेट्रोल-डिझलचे भाव लवकरच शंभरी गाठणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांमध्ये सोलापूर आणि औरंगाबादचा दुसरा क्रमांक लागला आहे. या दोन्ही शहरांमध्ये पेट्रोलचा आजचा दर ८७.९६ रुपये इतका आहे. एक नजर टाकूया राज्यातील महत्वाच्या शहरांमधील पेट्रोलच्या वाढलेल्या दरांवर.

वाचा : तेल कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठीच दरवाढ – राधाकृष्ण विखे पाटील

शहर आणि तेथील पेट्रोलचा दर

  • मुंबई –   ८६.९१ रुपये
  • पुणे- ८६. ७१ रुपये
  • नाशिक – ८७.३०
  • ठाणे – ८६. ९९ रुपये
  • नागपूर – ८७.३९
  • कोल्हापूर – ८७.१०
  • औरंगाबाद – ८७. ९६
  • सोलापूर – ८७. ९६
  • सिंधुदुर्ग – ८७.८३
  • अमरावती – ८८. १७
  • अहमदनगर – ८६.७६

वाचा : पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय राजकारण!

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -