पेट्रोल पंप डिलर्सचा ‘नो-पर्चेस डे; पेट्रोल पंपावर मात्र इंधन विक्री सुरू

ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) आज केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार आहे. यासाठी पेट्रोल पंप डीलर्स मंगळवारी पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही आहेत.

ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) आज केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार आहे. यासाठी पेट्रोल पंप डीलर्स मंगळवारी पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही आहेत. असे असले तरी पेट्रोल पंपावर (Petrol pump) पेट्रोल आणि डिझेलची विक्री होणार आहे. डिलर्सकडे इंधनाचा योग्य साठा राहत असल्याने वाहन चालकांना इंधन मिळण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याच परिणाम वाहनधारकांवर होणार नसल्याचे चित्र दिसते.

सर्वसामन्य जनतेचा आर्थिक संकटातून आणि वाढत्या महागाईतून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) उत्पादन शुल्कात कपात केली. मात्र या कपातीमुळे पेट्रोलियम डिलर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पेट्रोलियम डिलर्स मंगळवार हा ‘नो-पर्चेस डे’ म्हणून पाळणार आहेत. दरम्यान, याबाबत फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएननेचे पत्रक प्रसिद्ध झाले आहे. या पत्रकानुसार, 2017 पासून पेट्रोल डिलर्स मार्जिनमध्ये सुधारणा झालेली नाही. शासन व ऑइल कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार दर 6 महिन्यांनी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांशी निगडीत केले असून, याची अंमलबजाणीही झालेली नाही.

2017 सालापासून आतापर्यंत इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. या वाढत्या किंमतींमुळे गुंतवणूक, खर्च, बँकांचे व्याज, वेतन, विद्युत देयके, शासकीय शुल्कासह अन्य खर्चातही वाढ झाली. त्यामुळे इंधनाचे दर कमी करण्यासाठी आमचा पाठिंबाच आहे. मात्र शासनाने स्वत: 16 जूने 2017 रोजी सुरू केलेली डेली प्राईज चेंज पद्धत असता बदलली आणि ऑइल कंपन्यांना सोयीच्या घोषणा करताना डिलर्सचे नुकसान होणार नाही, याची खरबदारी घेणे आवश्यक आहे.

पूर्वीची दर 15 दिवसांनी दर बदलण्याची पद्धत सुरू करावी, अशी मागणी असोसिएशनने केली. २०१७ पासून कंपन्यांनी डीलरच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. इंधनाचे दर वाढल्याने त्यांची गुंतवणूक वाढत असताना नफा कमी झाला. त्यामुळे कमिशनमध्येही वाढीची मागणी केली. सर्व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेणे, कमिशन वाढावे, यासाठी ‘नो पर्चेस डे’ पाळण्यात येणार आहे.


हेही वाचा – दूध बंद झाल्यामुळे गाय सोडून देणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होणार, योगी सरकारचा निर्णय