घरताज्या घडामोडीकेंद्रानं पहिले राज्याच्या वाट्याचा GST परतावा द्यावा, पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरुन राऊतांची टीका

केंद्रानं पहिले राज्याच्या वाट्याचा GST परतावा द्यावा, पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरुन राऊतांची टीका

Subscribe

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. केंद्राकडून अबकारी करात घट करण्यात आल्यामुळे पेट्रोल ९ रुपये आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तसेच आता राज्य सरकारांनाही दरात कपात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आधी दरवाढ करायची आणि नंतर कपात करायची ही केंद्र सरकारची जुनी सवय असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्राने पहिले राज्य सरकारचा जीएसटी परतावा द्यावा अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रानंतर राज्य सरकार पेट्रोलचे दर कमी करणार का? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले की, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. केंद्राने इंधनाचे दर कमी केलेत ते पहिले वाढवले होते. १५ रुपये वाढवले होते आणि नंतर ९ रुपये कमी करायचे आणि आपली तिजोरी भरायची त्यातला हा भाग आहे. यावर राज्य सरकार आणि अर्थमंत्री, मुख्यमंत्री निर्णय़ घेतील. केंद्र सरकारची जबाबदारी आहे की तेलाच्या किमती कमी करायच्या, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय चाललंय हे तुम्हाला माहिती आहे. राज्य सरकार आपलं आपलं काम करत आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

केंद्राने पहिले महाराष्ट्राच्या वाट्याची जी जीएसटीची रक्कम परत करावी. त्यामुळे आम्हालाही ताकद मिळेल. जीएसटीसाठी विरोधक बोलत नाहीत. त्यांनीसुद्धा जीएसटीसाठी बोललं पाहिजे. असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांमुळे राज्य सरकार चालू आहे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, बाळासाहेबांचं शिल्लक आहे म्हणून महाराष्ट्रात सरकार चालू आहे. एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचेही ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठेही नव्हते. पण अटलजींचे आदेश आणि सुचना पाळल्या आहेत. शरद पवारांचे मार्गदर्शन पंतप्रधान घेतात अनेकवेळा सगळ्यांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांना कमी माहिती असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे.

- Advertisement -

भाजपने दाऊदला पकडून आणावे

नवाब मलिकांवरील आरोपांवरुन राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपची जर ही भूमिका असेल तर केंद्राने पाकिस्तानमधून दाऊदला भारतात फरफटत आणले पाहिजे. जसं अमेरिकेने लादेनला मारले तसं भाजपने पाकिस्तानमध्ये जाऊन दाऊदला पकडून आणले पाहिजे. दाऊद जिवंत आहे का हे त्यांनी आधी स्पष्ट केलं पाहिजे.


हेही वाचा : “ऐसी दादागिरी नही चलेगी” लिलावती रुग्णालयाच्या कारवाईवरुन सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -