करोना इम्पॅक्ट : पेट्रोल, डिझेलच्या मोठी दरात कपात

Today's Petrol & diesel prices
पेट्रोल, डिझेल

जगभरात सुरू असलेल्या तेल युद्धाचा परिणाम हा आता भारतातही दिसू लागला आहे. सौदी अरेबियाच्या अरॅमको कंपनीने कमी केलेल्या कच्च्या तेलाचे परिणाम आता आशियाई देशातही पहायला मिळात आहे. याचाच परिणाम आता भारतातील इंधनाच्या दर कपातीमध्ये परिणाम आज दिसून आला आहे. संपुर्ण भारतात आज डिझेल आणि पेट्रोलच्या दरात घसरण पहायला मिळाली आहे. दिल्लीत पेट्रोल हे लिटरमागे २.६९ रूपयांनी स्वस्त झाले आहे, तर डिझेलच्या किंमतीत २.३३ रूपयांची घसरण झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ७५.९९ रूपये तर डिझेलला ६५.९७ रूपये असा दर खाली आला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ७०.२९ रूपये आणि डिझेल ६३.०१ रूपये प्रति लिटर विक्री होत आहे. कोलकात्यात पेट्रोल ७२.९८ रूपये प्रति लिटर तर डिझेलला ६५.३५ रूपये प्रति लिटर असा दर आहे. तर चेन्नईत पेट्रोल ७३.०२ रूपये प्रति लिटर आणि डिझेल ६६.४८ रूपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमतीत ३० टक्के घट झाली आहे. २०१६ नंतरची ही सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सौदी अरेबियाने तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणत घट केल्यानेच ही मोठी घसरण पहायला मिळत आहे. रूस आणि ओपेक देश (१४ देशांची संघटना) यांच्यात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.

आतापर्यंत ओपेक राष्ट्रांनी आणि आणखी कच्च्या तेल निर्मितीतील देशआंनी करोना व्हायरसच्या परिणामामुळे झालेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठीच्या केलेल्या उपाययोजनांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. पण सौदी अरेबिया आणि रशियातले हे तेलाचे युद्ध टॅक्टिकल आणि मर्यादित कालावधीचे असेल असा तज्ञांचा दावा आहे. या तेल युद्धाच्या माध्यमातून अमेरिकेवर शेल इंधनाच्या उत्पादनावर दबाव आणण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.