घरदेश-विदेशपेट्रोल- डिझेलचे नवे दर लागू.. 'हे' आहेत नवे दर!

पेट्रोल- डिझेलचे नवे दर लागू.. ‘हे’ आहेत नवे दर!

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झाले आहेत. परीणामी भारतात आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. रविवारी पेट्रोल आण डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल १२ पैशांनी तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे. शनिवारी केंद्र सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्कात प्रति लीटर तीन रूपयांनी वाढ केली होती. रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार आता पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट वाढवण्यात आल्याने पेट्रोलचे भाव मुंबईतील इतर चार मेट्रो सिटींच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.

पेट्रोलचे नवे दर पुढीलप्रमाणे

मुंबईत ७५.४६ रुपये
दिल्लीत ६९.७५ रुपये
कोलकाता ७२.४५ रुपये
चेन्नई ७२.४५ रुपये

- Advertisement -

डिझेलचे नवे दर पुढीलप्रमाणे

मुंबईत ६५.३७ रुपये
दिल्लीत ६२.४४ रुपये,
कोलकाता ६४.७७ रुपये
चेन्नई ६५.८७ रुपये


हे ही वाचा – video: रो रो सेवा सुरू, आता अलिबाग गाठा पाऊण तासात!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -