राज्यात पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ; १ जूनपासून नवे दर लागू

Petrol Price Hike
पेट्रोलचे दर पुन्हा महागले

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार, १ जूनपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे आता पेट्रोल किंमत एक लिटरसाठी ७६.३१ वरून ७८.३१ रुपये इतकी होणार आहे. तर डिझेलची किंमत ६६.२१ वरून ६८.२१ रुपये इतकी आकारली जाणार आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलवर क्रमशः २६ टक्के व २४ टक्के व्हॅटदेखील घेतला जाणार आहे. या दरवाढीसंबंधची परिपत्रक शनिवारी राज्य सरकारने काढले असून त्यावर उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे.

हेही वाचा – मुंबई महापालिकेचे पाप राज्य सरकारच्या माथी!

गेल्या आठवड्यात सरकारी तेल कंपन्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत दररोज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली होती. देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील व्हॅटमध्ये दिल्ली सरकारसह देशातील अनेक राज्यांनी वाढ केली आहे. आज ३१ मे रोजी लॉकडाऊन ४ चा कालावधीत संपत आहे. तर देशात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बरीच सवलत मिळण्याची शक्यता आहे. ज्यानंतर देशातील रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढेल. याच कारणामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवू शकतात, अशी शक्यता यापूर्वी वर्तवण्यात आली होती.