घरCORONA UPDATELockdown : फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश; समितीची शिफारस

Lockdown : फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश; समितीची शिफारस

Subscribe

औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, तसेच द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर प्रथम वर्षाची परीक्षा घेण्यात यावी. या परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी त्याच्या प्रवेशाला कोणतीही बाधा येणार नाही, अशी सूचना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने नेमलेल्या समितीने केली आहे.

औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, तसेच द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर प्रथम वर्षाची परीक्षा घेण्यात यावी. या परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी त्याच्या प्रवेशाला कोणतीही बाधा येणार नाही, अशी सूचना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने नेमलेल्या समितीने केली आहे. देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशातील सर्वच शिक्षण संस्थांच्या परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने एका समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल कौन्सिलला सादर केला. यानुसार बीफार्म आणि बीफार्म (प्रॅक्टीस)च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षात प्रवेश द्यावा, अशी सूचना केली आहे. द्वितीय वर्षाचा अभ्यास सुरू झाल्यानंतर शैक्षणिक संस्था पहिल्या वर्षाच्या परीक्षा घेऊ शकतील. या परीक्षांच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्गातील प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नाही अशी सूचनाही समितीने केली आहे.

सध्या सर्व पदव्यांच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाउन संपल्यानंतर लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून घ्यावी. तसंच या परीक्षेचा निकाल लावण्यासाठीही कालावधी निश्चित करावा म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरला कोणतीही बाधा येणार नाही, असे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. तर बीफार्मच्या विद्यार्थ्यांना पुढच्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी सध्याच्या सत्रात ८० टक्के उपस्थितीची अट पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करावे लागेल, असे समितीने शिफारस केली आहे. आता प्रथम वर्षातून द्वितीय वर्षात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना तसेच सध्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ५० टक्के गुण मिळवणे बंधनकारक असेल. तसेच प्रकल्प अभ्यासातही किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रयत्नात सर्व विषयांचे मिळून ६० टक्के गुण मिळतील त्यांना प्रथम वर्ग श्रेणी तर ७५ टक्क्यांच्यावर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणी देण्यात यावी, असेही या समितीने सांगितले आहे. तर औषधनिर्माण शास्त्राच्या पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही पुढील सत्रात प्रवेश देण्याबाबतची सूचना या समितीने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -