Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र फोन टॅपिंग प्रकरण : CBIचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडून मान्य; रश्मी शुक्लांना दिलासा

फोन टॅपिंग प्रकरण : CBIचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडून मान्य; रश्मी शुक्लांना दिलासा

Subscribe

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिल्या आणि हा रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला. यानंतर आता राज्याच्या राजकारणात तापलेले फोन टॅपिंग प्रकरण पूर्णपणे बंद झाले आहे. 2019 मध्ये रश्मी शुक्ला या महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख पदी विराजमान होत्या. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नेत्यांचे रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांवर करण्यात आला.

या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब देखील नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने केलेल आरोप सिद्ध होत नसल्याचे सांगितले आणि सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिला. न्यायालयात सीबीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार फोन टॅपिंग प्रकरण पूर्णपणे बंद झाले आहे.

- Advertisement -

या प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर 2021 मध्ये गंभीर आरोप करण्यात आले. यात रश्मी शुक्ला आणि तत्कालीन डीजी सुबोध जायसवाल यांना दिली होती आणि ही सर्वाचे डॉक्युमेंट फडणवीसाकडे कसे आले. या प्रकरणात फडणवीसांवर आरोप केल्यानंतर फोन टॉपिंग प्रकरणी त्यांचा जबाब देखील नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा – फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ

रश्मी शुक्लांनी शिंदे-फडणवीसांची भेट

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर रश्मी शुक्लांनी फडणवीस-शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी रश्मी शुक्ला आणि शिंदे-फडणवीस भेटीने अनेक चर्चेला उधाण आले होते. यानंतर फोन टॅपिंग प्रकरण सीबीआयकडे गेले आणि आता सीबीआने क्लोजर रिपोर्ट दिलामुळे फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला.

हेही वाचा – फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला

- Advertisment -